google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोमवारी निघणार्‍या मुक मोर्चाशी तालुका काॅंग्रेसचा संबंध नाही. अमरजित पाटील.तालुकाध्यक्ष,पंढरपूर काॅंग्रेस

Breaking News

सोमवारी निघणार्‍या मुक मोर्चाशी तालुका काॅंग्रेसचा संबंध नाही. अमरजित पाटील.तालुकाध्यक्ष,पंढरपूर काॅंग्रेस

 सोमवारी निघणार्‍या मुक मोर्चाशी तालुका काॅंग्रेसचा संबंध नाही. अमरजित पाटील.

तालुकाध्यक्ष,पंढरपूर काॅंग्रेस 


पंढरपूर प्रतिनिधी, राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते व सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणराव काळे यांनी सोमवारी पंढरपूरमध्ये मुक मोर्चाचे महाविकास आघाडीच्या नावाखाली केलेले आहे.या मोर्चाशी तालुका काॅंग्रेस कमिटीचा कोणताही संबंध नाही.अथवा या मोर्चामध्ये पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी यामध्ये सहभागी होणार नाही.


मा.कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते आहेत.महाविकास आघाडीचे नेतृत्व हे कोणी एका पक्षाचा नेता करु शकत नाही.मोर्चाचे आयोजन करण्याआधी तालुका काॅंग्रेस कमिटीला विश्वासात घेण्यात आलेले नाही.परस्पर मोर्चाचे आयोजन करुन,सदर मोर्चा महाविकास आघाडीचा असल्याचे भासवले जात आहे.


वास्तविक,राष्ट्रवादीमधील अतंर्गत गटबाजीतून सदर मोर्चाचे स्वतंत्ररित्या आयोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादी मधील गटबाजी हा त्यांचा अंतर्गत विषय आहे.आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरावरील हल्ल्याचा पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी सोशल मिडीयावर जोरदार निषेध नोंदवलेला आहे.त्यामुळे परत नव्याने वेगळे आंदोलन करण्याची आवश्यक्ता पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटीला वाटत नाही.


त्यामुळे सोमवारी महाविकास आघाडीच्या नावाखाली मा.कल्याणराव काळे यांनी आयोजित केलेला मोर्चा पंढरपूर शहरात होणार असल्यामुळे शहर काॅंग्रेस कमिटी त्यात सहभागी होण्यासंदर्भात त्याच्या पातळीवर योग्य तो निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.याउपर पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटीचा या मोर्चाशी संबंध नाही.त्यामुळे पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी सदर मोर्चामध्ये सहभागी होणार नाही.

Post a Comment

0 Comments