डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करूया- काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे.
सांगोला (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सामाजिक विचारांची जयंती साजरी करूया
समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर ती पोलीस निरीक्षक कुलकर्णी साहेब यांनी कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचे मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष,रवींद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सांगोला पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी शांतता कमिटीची बैठक आयोजित केले होते त्या बैठकीमध्ये रवींद्र कांबळे बोलत होते दोन वर्षापासून कोरोना काळातील अनेक निर्बंध असल्यामुळे
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करता आली नाही यावर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महा विकास आघाडी सरकार यांच्या वतीने कोरोना चे सर्व निर्बंध रद्द केल्यामुळे यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करावी अशा पद्धतीचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केल्यामुळे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य सरकारचे अभिनंदन रविंद्र कांबळे यांनी केले. तालुक्यातील सर्व लोकांनी जयंती उत्साहात साजरी करावी तसेच
डॉ. बाबासाहेबांचे आंबेडकर यांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम करावे, पारंपारिक वाद्य सह, गीत गायन, शाहिरांचे पोवाडे यासह प्रबोधन करणारे कार्यक्रम व सामाजिक उपक्रम करून जयंती उत्साहात साजरी करूया अशा पद्धतीचे आवाहन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व बहुजन क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी व्यक्त केले. या शांतता कमिटीच्या बैठकीला विविध पक्षाचे पदाधिकारी जयंती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments