नवं टेन्शन... कोरोना काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा
सध्या कोरोना या महामारीचे सरकारने सर्व निर्बंध हटविल्यानंतर आता विविध प्रकारच्या कंपन्यांनी कर्मचारी भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे परंतु कोरोना काळात झालेल्या ऑनलाइन परीक्षा व त्यातून मिळालेल्या गुणांवर कंपन्यांना भरोसा वाटत नाही म्हणून त्यांनी मात्र विद्यापीठातर्फे घेण्यात स्वतःच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी सुरू केली आहे.
कोरोना मुळे विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या यामध्ये विद्यार्थी पास सुद्धा झाले परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. विद्यार्थ्यांना पुन्हा आशा पद्धतीने परीक्षेला सामोरन जावं लागत आहे. मिळालेले गुण यावर कंपन्या भरवसा ठेवत नसल्याने आता कंपन्या स्वत:च परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची पात्रता तपासत आहे. कंपन्या भरतीवेळी आशा पद्धतीने परीक्षा घेऊ लागल्याने इतरही ठिकाणी असेच झाले तर तेव्हा पास झाल्याचा काय फायदा असा प्रश्न निर्माण होईल.
मागील गेल्या दोन वर्षांत सर्वच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेतलेले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. अभियांत्रिकीसह सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक)करता आले नाही.
त्यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे (एमसीक्यू) झालेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्यामुळे नोकरी कोणाला द्यावी, असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा राहिला आहे आणि म्हणूनच आशा प्रकारे पुन्हा परीक्षा घेऊन त्यांची गुणवत्ता तपासली जात आहे. या प्रकारच्या भरती परीक्षांमुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेचे आणखी नवीन टेन्शन निर्माण झाले आहे.
0 Comments