google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील सोनंद येथील धक्कादायक घटना, सांगोला तालुक्यात वाळू तस्करांची दहशत वाढली, चक्क तक्रारदारालाच केली मारहाण

Breaking News

सांगोला तालुक्यातील सोनंद येथील धक्कादायक घटना, सांगोला तालुक्यात वाळू तस्करांची दहशत वाढली, चक्क तक्रारदारालाच केली मारहाण

 सांगोला तालुक्यातील सोनंद येथील धक्कादायक घटना

सांगोला तालुक्यात वाळू तस्करांची दहशत वाढली, चक्क तक्रारदारालाच केली मारहाण


सांगोला प्रतिनिधी,सांगोला शहर  आणि तालुक्यातील नदी काठच्या गावात अवैध वाळू चोरी जोरात चालू आहे.काल सोनंद गावात वाळू माफियानी वारंवार वाळू चोरीच्या तक्रारी महसूल आणि पोलिस प्रशासनास देणार्या सिद्धेश्वर भारत यादव वय 22 वर्षे व्यवयाय शिक्षण , रा . सोनंद ता . सांगोला जि . सोलापुर यास सात  ते आठ वाळू माफियानी बेदम मारहाण केल्याची 


घटना घडली असून मारहाण करणार्या वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

या घटनेची सविस्तर हकीकत अशी की तक्रारदार यादव हे  गावातील वाळु चोरी करणार्या  लोकांची माहीती वेळोवेळी संबंधीत विभागाला कळवित असे ,म्हणुन गावातील काहीजण हे यादव यांचेवर चिडुन होते. दि . 09/04/2022 रोजी रात्री 07 / 00 वाचे सुमारास यादव  मोटारसायकल वरुन गावात येवून  गावातील डॉ मोरे यांचे दवाखान्यासमोर सतिश काशिद , बापु चव्हाण , बबन कुलकर्णी यांचेसोबत बोलत उभे असताना  समोरुन महीपती बोराडे हा मोटारसायकल वरुन येवुन   पुढे गेला.


त्यानंतर थोड्याच वेळात त्याच्या पाठीमागुन लल्लन पवार याचा वाळु चोरीचा 407 टेम्पो वाळू भरून गेला . त्यानंतर यादव हे  मोटारसायकल घेवुन घराकडे निघाले असताना .  सावित्रीबाई कन्याप्रशालेच्या जवळील आप्पासाहेब कोळसे यांचे घराजवळ लल्लन पवार वाळू खाली करित होता . 


तक्रारदार रोडने जात असताना त्याने यादव याचेकडे येवून सांयं . 07/30 याचे सुमारास यादव यांचे समोरुन लल्लन पवार हा आला व त्याने माझी मोटारसायकल ची चावी काढून घेवून माझ्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करु लागला व मला टैम्पोकडे ओढू लागला . मी तिकडे अंधार असल्यामुळे उजेडात महादेव पाटील यांचे किराणा दुकानासमोर आलो तेव्हा लल्लन पवार याने मला जोरात धरले होते 


व स्पीकर मोबाईलवर स्पीकर ऑन करुन वाळू माफिया आतुल पाटील , बंडु काशिद , पप्पु काशिद यांना बोलावुन घेतले . तेव्हा ते सिद्ध्याला सोडु नको आम्ही आल्यावर बघतो , असे फोनवर म्हणाले होते . आतुल पाटील , बंडु काशिद , पप्पु काशिद यांचे सोबत प्रविण काशिद , महीपती बोराडे , अशोक पवार , समाधान पाटील हे आले


 त्यातील अतुल पाटील यांनी शिवागाळी करित मला खाली पाडले व लल्लन पदार याने तु माझ्या वाळूच्या गाडीचे शुटिंग करतो काय , तु कोणाला फोन लावला तुझा फोन बघु , असे म्हणुन माझे खिशातील व्हीवो व्ही 21 हा माझा मोबाईल काढुन घेतला व त्यांनी तु आमच्या वाळुची खबर देतो काय , असे म्हणुन शिवीगाळी करुन याला आता जिवंत ठेवु नका अशी धमकी देत . 


सर्वांनी मिळुन मला हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली तेव्हा मी जमीनीवर पडुन बेशुध्द झालो . त्यानंतर मी आज पहाटे 03 / 00 वाचे सुमारास जखमी अवस्थेत डॉ  गवळी यांचे हॉस्पीटल मध्ये शुध्दीवर आलो . तेव्हा तेथे माझी आई व भाऊ हे होते . मला मारहाणीत चेह - याचे डावे बाजुस कानावर डोकित मारलेले वळ आहेत . तसेच तोंडातून रक्त आलेले आहे . तसेच डावे बाजुचे डोळा रक्ताळलेला आहे .


 तरी मला मारहाण करून जखमी केलेल्या व माझा मोबाईल काढून घेवुन मला शिवीगाळी दमदाटी केलेल्या वाळू माफिया  2 ) आतुल पाटील , 3 ) बंडु काशिद , 4 ) पप्पु काशिद , 5 ) प्रविण काशिद , 6 ) महीपती बोराडे , 7 ) अशोक पवार , 8 ) समाधान पाटील सर्व रा . सोनंद ता . सांगोला जि . सोलापुर यांचे विरुद्ध फिर्याद दिली  असून पुढील तपास सांगोला पोलिस करीत आहेत

Post a Comment

0 Comments