केंद्रप्रमुख व शिक्षकांचा बेजबाबदारपणा ;पोषण आहाराला किड तर विद्यार्थ्यांचे ड्रेस देखील करतडले.
अशा बेजबाबदार शिक्षकांवर गुन्हे दाखल करावेत. बापूसाहेब ठोकळे बहुजन नेते
सांगोला / प्रतिनिधी : केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्या बेजबाबदारपणाचा कळस समोर आला आहे . जिल्हा परिषद शाळा भीमनगर येथील विद्यार्थ्यांसाठी शासनाने दिलेल्या पोषण आहारातील तांदूळ व कडधान्य अक्षरशा पूर्णपणे किडले आहेत . तर शालेय विद्यार्थ्यांचे कपडे- ड्रेस देखील कुरतडले आहेत .
याबाबत संतप्त समाजबांधव व पालकांनी संबंधित केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लावून धरल्यानंतर गट विकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली . व संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितल्या नंतरचं पालक व नागरिकांनी समन्वयाची भूमिका घेतली . परंतु शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर देखील परिणाम झाला .
अशा बेजबाबदार शिक्षकांची तात्काळ बदली करावी अन्यथा येत्या सोमवारपासून शाळेला टाळे ठोकणार असल्याचा इशारा देखील येथील नागरिकांनी दिला आहे . जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे कुपोषण प्रमाण कमी व्हावे . भावी पिढी सदृढ आणि निरोगी व्हावी म्हणून शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरु केली आहे . त्याची अंमलबजावणी शाळा स्तरापर्यंत व्यवस्थित होत नसल्याची बाब समोर आली आहे .
शहरातील भीमनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या बेजबाबदारपणामुळे शासनाचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाच नाही . तांदूळ आणि कडधान्याला कीड लागली तर विद्यार्थ्यांचे शालेय ड्रेस उंदीराने कुरतडले आहेत . यासंदर्भात भीमनगर परिसरातील समाजबांधवांनी व पालकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट पंचायत समितीकार्यालय गाठले . याबाबतची सत्यता पाहणीसाठी स्वतः गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट द्यावी
आणि तपासणी करावी असा आग्रह धरला . नागरिकांच्या आग्रहाखातर गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळा भीमनगर येथे भेट दिली . भेटीदरम्यान शालेय पोषण आहारातील तांदूळ व कडधान्य यांना कीड लागल्याचे दिसून आले . तर शालेय विद्यार्थ्यांचे ड्रेस देखील उंदीरांनी कुरतडल्याचे दिसून आले . दरम्यान गोरगरीब चिमुकल्या बालकांसाठी मिळालेला खाऊ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला नाही .
विद्यार्थ्यांच्या घशातील घास काढून घेण्याचे अघोरी काम येथील शिक्षकांनी केले आहे . यावर नियंत्रण ठेवणारे केंद्रप्रमुख यांचे दुर्लक्ष असल्याने सदरचा प्रकार घडला आहे . अशा बेजबाबदार केंद्रप्रमुख व शिक्षकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी लावून धरली . संतप्त नागरिकांची मागणी लक्षात घेता , व शाळेतील पोषण आहार व शालेय विद्यार्थ्यांचे ड्रेस याची परिस्थिती पाहता गटविकास अधिकारी यांनी संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असा शब्द दिला .
यावेळी पालकांनी मोठा संताप व्यक्त केला . विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे कोणते घोडे मारले असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी गटविकास अधिकारी यांना विचारला . संबंधितावर कारवाई व्हावी अन्यथा यापुढील काळात समाज बांधव वेगळाविचार करतील असा इशारा देखील यानिमित्ताने उपस्थितांनी दिला .
यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे , माजीनगरसेविका विजयाताई बनसोडे , अप्सराताई ठोकळे , बाबासाहेब बनसोडे , बाळासाहेब बनसोडे , सतीश काटे , सोपान उर्फ आण्णा बनसोडे , सुहास बनसोडे , जयंती बनसोडे , पूजा माने व भीमनगर व परिसरातील नागरिक - महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
*चौकट-
बेजबाबदार शिक्षकांची तात्काळ बदली करावी अन्यथा येत्या सोमवारपासून शाळेला टाळे ठोकणार : समाज बांधव आक्रमक
भीमनगर जिल्हा परिषद शाळेतील संबंधितांवर कारवाई करणार : गटविकास अधिकारी यांची जिल्हा परिषद शाळेला भेट
गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मिळालेला खाऊ व विद्यार्थ्यांसाठी मिळालेले कपडे अर्थात शालेय ड्रेस कोड केंद्रप्रमुख व शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे व बेजबाबदारपणामुळे पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे . अक्षरशा विद्यार्थ्यांच्या घशातील पोषण आहाराचा गास काढून घेण्याचे काम येथील शिक्षकांनी केले आहे . अशा बेजबाबदार शिक्षकांवर गुन्हे दाखल करावेत . - बापूसाहेब ठोकळे बहुजन नेते -


0 Comments