google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नाझरे येथील शेकापच्या अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश विकासाचे राजकारण करण्यासाठी सर्वांनी साथ द्या - आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

नाझरे येथील शेकापच्या अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश विकासाचे राजकारण करण्यासाठी सर्वांनी साथ द्या - आमदार शहाजीबापू पाटील

 नाझरे येथील शेकापच्या अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश


     विकासाचे राजकारण करण्यासाठी सर्वांनी साथ द्या  - आमदार शहाजीबापू पाटील


नाझरे प्रतिनिधी नाझरे ता सांगोला व माझे नाते वेगळे आहे या गावातील माझे सवंगडी कै काकासो सरगर  कै शिवाजी पाटील गोरख आदाटे मुकुंद पाटील बसू पाटील यांच्याबरोबर खेळण्यात गेले त्यामुळे ज्या गावात मी रमलो त्यात गावातील परीट माळी समाजातील नवयुवक यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचा योग्य सन्मान केला जाईल व त्यांच्या पाठीशी आपण स्वतःवर शिवसेना पक्ष ताकतीने उभी राहील याची ग्वाही देतो व आजपर्यंत आपण 


सांगोला तालुक्यातील पिण्याचे पाणी शेतीचे पाणी रस्त्याची अनेक कामे मार्गी लावली व यापुढेही अनेक प्रश्न सोडवून विकासाचे राजकारण केल्याशिवाय आपण थांबणार नाही परंतु यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व गेली पन्नास वर्षे गुलामगिरीने जगला यापुढे शिवसेनेत घेऊन स्वाभिमानाने जगा सर्वांची काळजी घेऊ असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी नाझरे येथे परीट माळी समाजाच्या अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश प्रसंगी नाजरे ग्रामपंचायत समोर सभेत मत व्यक्त केले


पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचा प्रश्न 50 वर्षात सुटला नाही तो आमदार शहाजीबापू नी सोडवला व सर्वात जास्त निधी आणणारा एकमेव बापू आमदार आहेत व नाजरे गाव बारा बलुतेदारांच्या असून आपण ग्रामपंचायत मध्ये घरचे उमेदवार निवडून येऊनही माळी समाजाचा कै निवृत्‍ती बनसोडे यांना सरपंच केले 


त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीमागे आपण सदैव पाठीशी राहू व आज परीट व माळी समाज यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे स्वागत करतो व कोणतीही अडचण राहणार नाही येणार नाही पक्ष व आपण स्वतः पाठीशी राहू तसेच उदनवाडी नाजरे अजनाळे रस्ता लवकरच मार्गी लागेल परंतु सर्वांनी शिवसेनेस ताकद द्या कोणतेही काम राहणार नाही सर्वांना सहकार्य करू असे मत शिवसेना नेते दादासो वाघमोडे यांनी व्यक्त केले


सांगोला तालुक्यातील विकासाचे बुलेट ट्रेन थांबणार नाही त्यामुळे नाझरे येथील युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे संरक्षण व सहकार्य बापू करतील त्यामुळे नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांनी कामाला लागा असा मौलिक सल्ला शिवसेना नेते भाऊसो रुपनर यांनी दिला यावेळी माळेवाडी अनकढाळ माजी सरपंच संजय आदाटे 


नाझरे येथील बाबासो भंडारे दिलीप भंडारे राजकुमार भंडारे वसंत भंडारे ज्येष्ठ नेते महादेव भंडारे आकाश भंडारे नागेश भंडारे समाधान बापू भंडारे विक्रम भंडारे अरुण (बारक्या )भंडारे, अनिकेत भंडारे हरी भंडारे सुरज भंडारे रविराज भंडारे ऋषिकेश भंडारे सुनील बनसोडे संतोष बनसोडे रामचंद्र बनसोडे ज्येष्ठ नेते उत्तम बुवा वाघमारे व तुकाराम धांडोरे यांनी शेकाप मधून शिवसेनेत प्रवेश केला सर्वांचे फेटा हार देऊन आमदारांनी स्वागत सत्कार केला


सदर प्रसंगी ज्येष्ठ नेते हरी पाटील राजाभाऊ खरात मंगेश रायचुरे विनु काका देशपांडे पत्रकार रविराज शेटे मुकुंद पाटील रमेश पाटील अण्णा पाटील अमोल विभुते प्रा लक्ष्मण ढोबळे युवराज शेटे साहेबराव शिंदे उत्तम सरगर अजय सरगर महादेव पवार महादेव शिंदे ग्रामपंचायत सदस्य के आर वाघमारे जीवन कांबळे दिलीप सरगर आण्‍णासो मोहिते सर्जेराव मोहिते सुरेश शिंदे दत्ता निंबाळकर संपत्ती कोकरे चंदर रेड्डी 


राजू पाटील संजय पाटील संजय आलदर तानाजी काटे भैय्या वाघमोडे महादेव चव्हाण विनोद चव्हाण अजय चव्हाण महेश बुधावले भारत चव्हाण मल्हारी चव्हाण किसन सरगर डीएम बनसोडे विजय बनसोडे अक्षय बनसोडे सचिन बनसोडे दादा चव्हाण दत्तात्रेय अडसूळ तात्या चव्हाण अजय चव्हाण भिमराव माने राजू माने बाळू माने परीट माळी समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments