डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन महूदमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शेतकरी परिषद
महूद , ता . ५ राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरुवारी ( ता . ७ एप्रिल ) सायंकाळी महूद ( ता . सांगोला ) येथे शेतकरी परिषद होत आहे . यामध्ये जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे .
रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मैदानावर होणाऱ्या शेतकरी परिषदेसाठी जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन महूद ग्रामस्थांनी केले आहे . माजी आमदार दीपक आबा साळुंखे - पाटील यांनी ही माहिती दिली . लोकसहभागातून राष्ट्रीय जल पुरस्कार महूदकरांनी मिळवला .आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ . राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन जलक्रांतीसाठी मिळाले आहे . जलक्रांतीमध्ये दिल्याबद्दल
श्री . भुजबळ हे महूद ग्रामस्थांचे परिषदेत कौतुक करणार आहेत . शेतकरी शेतकरी योगदान परिषदसाठी आमदार शहाजी पाटील , माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील , युवा नेते डॉ . बाबासाहेब देशमुख , अखिल भारतीय डाळिंब उत्पादकमहासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे आदी उपस्थित राहणार आहेत . डाळिंब उत्पादक घालणार साकडे डाळिंब पंढरी म्हणून सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याने ओळख तयार केली आहे .
नैसर्गिक आपत्ती आणि रोगकिडीमुळे डाळिंब पंढरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे .जिद्दीने उभ्या केलेल्या डाळिंब बागा शेतकऱ्यांनी तोडल्या आहेत . त्यामुळे डाळिंब पंढरीचे उत्पादन वर्षाला ३ हजार कोटी रुपयांवरून यंदा ८०० कोटींपर्यंत कमी झाले . पुढील वर्षी ४०० कोटी मिळेल की नाही , असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे . अशा कठीण काळात डाळिंब पंढरी पुन्हा उभी रहावी
म्हणून शासनाचे सहकार्य यासाठी डाळिंब उत्पादकांची बाजू लावून धरावी , असे साकडे शेतकरी परिषदेत श्री . भुजबळ यांना घालण्यात येणार आहे . डाळिंब पंढरी पुन्हा उभी करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून विशेष पॅकेज मिळावे , अशी विनंती श्री . भुजबळ यांना केली जाणार आहे . परिषदेसाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे , असे अखिल भारतीय समता परिषदेतर्फे आवाहन करण्यात आले आहे .


0 Comments