सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या….!
बीड: सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळलेल्या शिक्षकाने आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी राहुल ईश्वर वाघमारे या शिक्षकाणे आत्महत्या केल्याची घटना समोर आली. राहुल वाघमारे हे शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते.
आज सकाळी त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह कुटुंबियांना आढळला. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास हाती घेतली. शिवाजी नगर पोलिस या प्रकरणी तपास करत असून त्यांना शिक्षकाच्या घरात एक सुसाइड नोट देखील आढळली. त्यानंतर सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून सदर शिक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आत्महत्या करण्यापूर्वी ईश्वर वाघमारे यांनी सुसाइड नोट लिहिली असून त्यात प्राध्यापक बाळासाहेब लाखे आणि त्यांचा सहकारी मुन्ना लोंढे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहचले असून सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत. सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.


0 Comments