मोहोळजवळ कार- ट्रक अपघातात एका पोलिसासह दोघे ठार
या अपघातानंतर मोहोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी माेहोळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली आहे.
मोहोळ : विशेष प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील सारोळे पाटीनजीक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात एका पोलिसाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर ते पुणे महामार्गावर मोहोळहून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला एक ट्रक थांबला होता. या थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक दिली, असे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे. या धडकेत दोन जण जागीच ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. या अपघातात सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची नावे अद्याप समजली नाहीत.
या अपघातानंतर मोहोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी माेहोळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहने सुसाट धावत असल्याने या भागात सतत अपघात होत असतात.या अपघातानंतर मोहोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी माेहोळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली आहे.


0 Comments