"विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी आरोपी सोमनाथ अशोक बदडे यास जामीन अर्ज मंजूर"
प्रतिमा अशोक बदडे या विवाहितेने नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे कंटाळून स्वतःच्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केली होती या घटनेमुळे विवाहितेच्या वतीने तिचे वडील बाळासाहेब कृष्णदेव मायने यांनी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम 306, 323 ,498अ, 506 प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 126/2022 गुन्हा दाखल केला होता. यात या आरोपीस अटक करण्यात आली होती
सदर आरोपीने ॲड.विजय साहेबराव बेंदगुडे यांच्यामार्फत पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये जामीन अर्ज दाखल केला होता सदर अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील विजय साहेबराव बेंदगुडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश बोरा मॅडम यांनी सदरचा जामीन अर्ज मंजूर केला आरोपीच्या वतीने ॲड .अमोल देसाई विशाल वाघेला ॲड .सत्यम धुमाळ , ॲड.तुषार शिंदे यांनी काम पाहिले


0 Comments