google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला : स्विमिंग टॅंकमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू ; मृत विद्यार्थी जत तालुक्यातील

Breaking News

सांगोला : स्विमिंग टॅंकमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू ; मृत विद्यार्थी जत तालुक्यातील

 सांगोला : स्विमिंग टॅंकमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू ; मृत विद्यार्थी जत तालुक्यातील 

सांगोला ,जत  : सांगोला येथे स्विमिंग टॅंकमध्ये पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पृथ्वीराज प्रमोद कोडग (वय-१८, मूळगाव निगडी खुर्द, ता. जत) पाण्यात बुडून मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना सांगोला (जि. सोलापूर) येथील एका स्विमिंग टॅंकमध्ये रविवारी सकाळी घडली. दरम्यान, स्विमिंग टॅंक चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप पृथ्वीराज  कोडगच्‍या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पृथ्वीराज कोडग यांचे मूळगाव निगडी खुर्द येथील आहे. काही कामानिमित्त कोडग यांचे कुटुंब सांगोला येथे वास्तव्यास आहे. पृथ्वीराज यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली हाेती. सांगोला येथील स्विमिंग टॅंकमध्ये पोहायला जात होता.


 रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसमवेत पोहायला गेला होता. पृथ्वीराज पाण्याच्या बाहेर उशिरा आला नाही. म्हणून सोबतच्या मित्राने याबाबतची माहिती स्विमिंग टॅंक चालकाला सांगितली. यावेळी त्यांनी पृथ्वीराज बाहेर गेला आहे की, नाही याबाबतची सीसीटीव्हीमध्ये पाहणी केली. 


यावेळी पृथ्वीराज बाहेर गेला नसल्याचे दिसून आले. टँकमधील  पाणी उपसले यावेळी पृथ्वीराज मृतावस्थेत आढळून आला. पृथ्वीराजला पोहण्यासाठी संरक्षणासाठी लाईफ जॅकेट दिली नसल्याचे निदर्शनास आले. ददरम्यान, स्विमिंग टॅंक चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप पृथ्वीराज  कोडगच्‍या नातेवाईकांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments