क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती निमित्त सांगोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी): थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त सांगोला येथे सोमवार दि. १९ एप्रिल २०२२ रोजी तालुक्यातील फुले प्रेमींच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास सामुदायिक पुष्पहार अर्पण सोहळा पार पडणार आहे. ९ वाजता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेची भव्य पदयात्रा, शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
सकाळी १० ते २ या वेळेत महात्मा फुले चौक, सांगोला येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता जयंती कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, पुरस्कार वितरण व बक्षीस वाटप कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. कल्याणराव आखाडे, पश्चिम महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे अध्यक्ष मा. दत्तात्रय घाडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक सायं. ६ वाजता निघणार आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्या कार्याचे सजीव देखावे, बॅन्जो, हलगी, ढोल-ताशे व सर्व सांस्कृतीक वाद्ये यांचा समावेश असणार आहे. तरी सांगोला तालुक्यातील तमाम बहुजन बांधवांनी व फुलेप्रेमी जनतेने महिला, युवकांसह सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ व फुले प्रेमी मंडळ, सांगोला शहर व तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.


0 Comments