सांगोल्यात मुसळधार, कोळ्यात गारांचा वर्षाव
सांगोला तालुक्यातील कोळा भागात गारा पडल्या. भर दुपारी उन्हात गारा पडल्या. या गारांच्या माऱ्याने द्राक्ष व इतर फळपिकांचे नुकसान झाले आहे.
सांगोला/ सांगोला शहरासह कोळा गावात जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. शुक्रवार, 8 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास हा पाऊस पडला आहे. सांगोला तालुक्यात तिन्हीही ऋतू सारखेच वाटू लागले असून, ऐन उन्हाळ्यात सुरुवातीलाच पाऊस पडण्याची ही 54 वर्षातील पहिलीच घटना आहे. तालुक्यात पावसाळा तर आठ महिने पहावयास मिळाला.
सांगोल्यात वीज अशी कडकडली.
सांगोला तालुक्यातील वाढेगाव, जूनोनी, वाणीचिंचाळे तसेच आजुबाजुच्या अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढल्याचे वृत्त आहे.
उन्हाळा सुरू होवूनही एक महिना उलटला,पण काही केल्या अजूनही पाऊस थांबेना. जसा एप्रिल महिना सुरू झाला, तसे उन्हाच्या झळाही तीव्र झालेल्या आहेत. 5 एप्रिलपासून तर सांगोला तालुक्यात दररोजच कुठे ना कुठे पाऊस होतच आहे. दिवसभर ऊन्ह तर रात्री वीज गायब होत असल्याने हा उन्हाळा पावसाने गारद करीत आहे. गेली दोन दिवसापासून तर यात वाढ झाली असून, आज शुक्रवार कोळा भागात भर दुपारी वादळी वारे अन्.गारांचा पाऊस यामुळे जनजीवन विस्कळित झाले.
कोळा भागात ह्या गारा तब्बल 15 मिनिटे पडतच होत्या.
वाणीचिंचाळे तसेच आजुबाजुच्या अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढल्याचे वृत्त आहे.
कोळा भागात गारा पडल्या
सांगोला तालुक्यातील कोळा भागात गारा पडल्या. भर दुपारी उन्हात गारा पडल्या. या गारांच्या माऱ्याने द्राक्ष व इतर फळपिकांचे नुकसान झाले आहे.



0 Comments