google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आसाराम बापूच्या आश्रमात कारमध्ये सापडला चक्क मुलीचा मृतदेह…!

Breaking News

आसाराम बापूच्या आश्रमात कारमध्ये सापडला चक्क मुलीचा मृतदेह…!

 आसाराम बापूच्या आश्रमात कारमध्ये सापडला चक्क मुलीचा मृतदेह…!



गोंडा : आसाराम बापूच्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथील आश्रमात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आसारामच्या आश्रमात पार्क केलेल्या कारमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला. मृत मुलीचे वय १३ ते १४असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ माजली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ही मुलगी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विमौर परिसरात असलेल्या आश्रमात ही घटना घडली आहे. मुलगी ५ एप्रिलपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह चार दिवसांनी आढळला आहे. आश्रमातील एका कारमध्ये तिचा मृतदेह आढळला. 


कारमधून दुर्गंधी येत असल्याने तेथील व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमाचे सुरक्षारक्षकाने कार उघडून बघितली. त्यावेळी आतमध्ये मुलीचा मृतदेह आढळला.

Post a Comment

0 Comments