वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न .
सांगोला (प्रतिनिधी) सांगोल्यातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ संपन्न झाला.
यावेळी प्रशालेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एस एस सी परीक्षेस सामोरे जाताना कोणतेही दडपण न आणता सकारात्मक वृत्तीने परीक्षेस सामोरे जावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. याच वेळी परीक्षेविषयी उपयुक्त सूचना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिल्या . निरोप समारंभ वेळी प्रशालेतील एसएससी मार्च 2022 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी या विद्यार्थ्यांनि प्रशालेस थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या, प्रास्ताविक मुख्याध्यापिका ए व्ही गोडसे मॅडम यांनी केले .शेवटी आभार सुवर्णा इंगवले यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments