google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीसांना जबरी चोरी व दरोडयातील ०४ गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणुन त्यांचे कडुन गुन्हयातील ३ लाख रुपयांचा मुददेमाल जप्त

Breaking News

सांगोला पोलीसांना जबरी चोरी व दरोडयातील ०४ गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणुन त्यांचे कडुन गुन्हयातील ३ लाख रुपयांचा मुददेमाल जप्त

 सांगोला पोलीसांना जबरी चोरी व दरोडयातील ०४ गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणुन त्यांचे कडुन गुन्हयातील ३ लाख रुपयांचा मुददेमाल जप्त 

करण्यात यश दिनांक ०४/०३/२०२२ रोजीचे पहाटे ०२ / ३० वा . चे सुमारास यातील फिर्यादी हे राशीन ता . कर्जत येथुन अकलुज मार्गे महुद आटपाडी रोड ने करगणी येथे त्यांचेकडील महिंद्रा बोलेरो पिकअप रजि.क. एम . एच . २३ डब्लयु २६ ९ ४ हा घेवुन जात असताना शेरेवाडी फाटयाच्या पुढे 


सांगोला ता . सांगोला येथे ०३ अनोळखी इसमांनी टाटा कॅम्पर या वाहनातुन पाठीमागुन येवुन फिर्यादीचे वाहनास गाडी आडवी लावुन वाहनास कट का मारला असे म्हणुन फिर्यादीस लाकडी दांडक्याचा धाक दाखवुन फिर्यादीचें ताब्यातील १ ) ३,००,००० / - रूपये किंमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप पांढ - या रंगाचा त्यास मागे हुडला हिरवट मेहंदी रंगाची ताडपदरी असलेला रजि . क्र . एम . एच . २३ डब्लयु २६ ९ ४ असा असलेला पुढील काचेवर भगव्या रंगात छत्रपती असे लिहलेले 


जु.वा. किं.अं. २ ) ५००० / - रूपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा सिल्व्हर कलरचा मोबाईल त्यामध्ये जिओ कंपनीचे सीम क्र . ९ ७६६ ९ ०५८३८ असा असलेले जु.वा. किं . अं . जबरीने चोरून घेवुन गेले आहेत . म्हणुन त्या तीन अज्ञात इसमा विरूध्द सांगोला पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ३ ९ २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . सदर गुन्हयाचा तपास चालु असताना गोपनीय खब - या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगोला पोलीस ठाणेकडील गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन टीम नेमुण सदर गुन्हयातील जबरीने चोरून नेलेल्या मालाचा व आरोपींचा शोध घेतला असता 


दिनांक १०/०३/२०२२ रोजी सकाळी ० ९ / ०० वा . च्या दरम्यान गोपनीय माहीती मिळाली की , सदरचा गुन्हा एकुण ०५ आरोपींनी केलेला असुन त्यांनी जबरीने चोरून नेलेल्या बोलेरो पिकअप वाहनाचे पार्ट कट केलेले आहेत व सदरचे वाहन अर्ध्या तासामध्ये विक्री करणार आहेत सदरचे वाहन हे महुद भागामध्ये शेतामध्ये लपवुन ठेवले बाबत माहिती मिळाल्याने पोलीस पथक हे महुद भागामध्ये सदर वाहनाचा शोध घेत असताना एका इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांस ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने 


सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवुन सदर गुन्हयात सामील असलेल्या त्याचे इतर ०४ साथीदारांची नावे सांगितली आहेत . त्यापैकी ०४ आरोपींना सदर गुन्हयात अटक करून तपास केला असता आरोपींनी निवेदन पंचनाम्याप्रमाणे सदर गुन्हयात जबरीने चोरून नेलेली महिंद्रा बोलेरो पिकअप पांढ - या रंगाचा रजि . क . एम . एच . २३ डब्लयु २६ ९ ४ असा असलेला , तसेच त्याचे कापलेला टप काढुन दिला तो अंदाजे ०३,००,००० रू . किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . 


तपासामध्ये सदरचा गुन्हा हा ०४ पेक्षा जास्त आरोपीनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयास भा.द.वि. कलम ३ ९ ५ हे वाढ करण्यात आलेले आहे . सदर गुन्हयाचा तपास मा . श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम सो , पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण , मा . श्री . हिम्मत जाधव सो , अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण , श्रीमती राजश्री पाटील मॅडम , सो उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा ,


 पोनि श्री अनंत कुलकर्णी सो , यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / नागेश यमगर , पोहेकॉ / १५४७ दत्ता वजाळे , पोना / १६८२ अभिजीत मोहोळकर , पोना / १६५० विजय थिटे , पोना / ५४६ कृष्णा पकाले , पोना / १६४० आप्पासाहेब पवार , पोहेकॉ / ८११ राजु चौगुले , पोना / १५७७ राहुल कोरे , चापोना / संभाजी काशीद व सायबर पोलीस स्टेशन कडील पोकॉ / २२१६ अन्दर अत्तार यांनी मदत करून गुन्हा उघडकीस आणला आहे .

Post a Comment

0 Comments