google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाची महत्त्वपूर्ण बैठक टिळक भवन मुंबई येथे संपन्न.... ॲड. महादेव कांबळे यांनी काँग्रेस पक्षवाढी संदर्भात मांडली महत्त्वपूर्ण भूमिका..

Breaking News

काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाची महत्त्वपूर्ण बैठक टिळक भवन मुंबई येथे संपन्न.... ॲड. महादेव कांबळे यांनी काँग्रेस पक्षवाढी संदर्भात मांडली महत्त्वपूर्ण भूमिका..

 काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाची महत्त्वपूर्ण बैठक टिळक भवन मुंबई येथे संपन्न....

 ॲड. महादेव कांबळे यांनी काँग्रेस पक्षवाढी संदर्भात मांडली महत्त्वपूर्ण भूमिका..

सांगोला प्रतिनिधी-  टिळक भवन दादर मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच सांस्कृतिक विभाग राज्य अध्यक्षा विद्या कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक विभागाचे राज्याचे उपाध्यक्ष व पश्‍चिम महाराष्ट्राचे समन्वयक ॲड. महादेव कांबळे यांनी सांस्कृतिक विभागाच्या कामाचा आढावा सर्वांसमोर मांडला. आपल्या मनोगतात ॲड. कांबळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या सांस्कृतिक विभागाने गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षासाठी अत्यंत जोमाने काम केले आहे.  


पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक विभागाचे काम उल्लेखनीय आहे. सर्वांसमोर आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीने आपली भूमिका मांडत असताना सर्वांची मने जिंकून घेतली. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणीच्या संदर्भामध्ये  सांस्कृतिक विभागाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन डिजिटल सभासद नोंदणी करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.काँग्रेस पक्षा शिवाय देशाला दुसरा पर्याय नाही. काँग्रेस पक्षाने या देशातील जनसामान्य माणसांच्या न्याय हक्काची लढाई लढली. काँग्रेस पक्षाची चळवळ ही आज देशाची गरज आहे हे पटवून सांगण्यासाठी सांस्कृतिक विभाग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत ताकदीने काम करत असल्याचे मत व्यक्त केले. 


सांस्कृतिक विभागाच्या राज्य अध्यक्ष विद्या कदम व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे यांनी ॲड.कांबळे यांचे विशेष कौतुक केले.  ॲड. कांबळे यांच्यासारख्या होतकरू व अभ्यासपूर्ण कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षामध्ये मोठी फळी उभी राहायला हवी. त्यांनी पक्षासाठी जोमाने काम करावे. त्यांना निश्चितच चांगले दिवस येतील व त्यांना उज्वल भविष्य आहे. असे गौरवोद्गार  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे यांनी काढले.


पुढे बोलताना भाई नगराळे असे म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार हे जनसामान्य माणसाची फसवणूक करणारी यंत्रणा असून त्याला कोणीही बळी पडू नये. सामान्य माणसाला खोटी आश्वासने देऊन त्यांचे जगणे मुश्किल करणारे हे सरकार आपण उलथवून टाकले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भाजप मुक्त देश करून जनसामान्यांच्या मनातील सरकार म्हणजे काँग्रेस पक्षाचे सरकार यायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.  राज्याध्यक्ष विद्या कदम यांनी सांस्कृतिक विभाग महाराष्ट्रामध्ये अत्यंत जोमाने काम करत असून हा विभाग इथून पुढे काँग्रेस अक्षा सोबत अतिशय निष्ठेने काम करेल असे मत व्यक्त केले.


या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग अध्यक्षा विद्या कदम, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष भाई नगराळे, मुनाफ हकीम, सांस्कृतिक विभागाचे राज्य कार्याध्यक्ष व प्रवक्ता खलील सय्यद, सांस्कृतिक विभागाच्या राज्य कार्याध्यक्ष फर्जाना डांगे, महाराष्ट्र समन्वयक व कार्याध्यक्ष सम्राट साळवी, सांस्कृतिक विभागाच्या प्रवक्त्या समीरा मिस्त्री ,राज्य सचिव पूजा सावंत त्याचबरोबर अमरावती विभागाचे समन्वयक सचिन गुडे, नागपूर विभागाचे गणेश लिमजे, कोकण विभागाचे समन्वयक राकेश चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण डॉ. विशाल वाळुंज, सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कविता कदम, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले विविध जिल्ह्यातील शहर ग्रामीण अध्यक्ष या बैठकीसाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डांगे यांनी केले तर आभार समीरा मेस्त्री यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments