google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नात्याला काळिमा ! पुतण्यानेच केला चुलतीवर बलात्कार

Breaking News

नात्याला काळिमा ! पुतण्यानेच केला चुलतीवर बलात्कार

 नात्याला काळिमा ! पुतण्यानेच केला चुलतीवर बलात्कार 

 महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत .अशाच एका घटनेने पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .पुणे जिल्ह्यातील भिगवण  येथे एका नराधम पुतण्यानेचुलतीवर बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपीने चुलतीवर बलात्कार केल्यानंतर याची वाच्यता कोठे केल्यास कुटुंबाला कापून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडित महिलेने आठ दिवसांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद  दिली. पोलिसांनी नराधम पुतण्याला अटक केली आहे.


पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी इत्यादी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा धक्कादायक प्रकार 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान घडला आहे. आरोपी पीडितेचा पुतण्या असून त्याने महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून बलात्कार केला. यानंतर वेळोवेळी पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता. आरोपी हा नातेवाईक असल्याने व त्याने ही घटना कोणास सांगितली तर तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धकमी दिली. 


घाबरलेल्या पीडित महिलेने वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर आठ दिवसांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.

Post a Comment

0 Comments