दक्षिण कोरियात एकाच दिवशी कोरोनाचे ६ लाख रुग्ण
एकाच दिवशी एखाद्या देशात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याची जगातील पहिलीच घटना दक्षिण कोरियामध्ये गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे ६ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळन आल्यानेजगभर खळबळ उडाली आहे . एकाच दिवशी एखाद्या देशात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याची जगातील ही पहिलीच घटना आहे .
विशेष म्हणजे या देशाने कोरोनाच्या आतापर्यंतच्या लाटेत कधीही लॉकडाऊन केलेले नाही .देशात मोठ्या प्रमाणावर सातत्याने कोविड चाचणी होत असल्याने संसर्गाची इतकी प्रकरणे समोर आली आहेत , असे स्पष्टीकरण दक्षिण कोरियाच्या आरोग्य खात्याने दिले आहे . दक्षिण कोरियामध्ये लसीकरण दर ८८ टक्के आहे .
यासोबतच जगातील सर्वाधिक बूस्टर शॉट्स असलेल्या देशांमध्येही त्याचा समावेश आहे . विशेषतः वृद्धांना येथे मोठ्या प्रमाणात बूस्टर डोस देण्यात आला आहे . अत्याधुनिक लसीकरणामुळे येथील मृत्यूदर ०.१४ टक्केवर आला आहे , जो दोन महिन्यांपूर्वी ०.८८ टक्के होता . सध्याचा मृत्यू दर अमेरिका आणि ब्रिटन यांच्या मृत्यूदरांच्या एकदशांश आहे . मात्र त्याच कालावधीत संसर्गाची प्रकरणे ८० पट वाढली आहेत .
0 Comments