google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस :ऑन ड्युटी वर सुद्धा” मदिरा ” शी प्रेम करून तिला पोटात घालणाऱ्या आणि ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या ब्रीद वाक्याची पोलिसांनीच ” वाट “लावली..!आयुक्त पाण्डेय यांनी त्यांना तडकाफडकीने ” निलंबनाची” भेट दिली !!!

Breaking News

पोलीस :ऑन ड्युटी वर सुद्धा” मदिरा ” शी प्रेम करून तिला पोटात घालणाऱ्या आणि ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या ब्रीद वाक्याची पोलिसांनीच ” वाट “लावली..!आयुक्त पाण्डेय यांनी त्यांना तडकाफडकीने ” निलंबनाची” भेट दिली !!!

 पोलीस :ऑन ड्युटी वर सुद्धा” मदिरा ” शी प्रेम करून तिला पोटात घालणाऱ्या आणि

” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या ब्रीद वाक्याची पोलिसांनीच ” वाट “लावली..!आयुक्त पाण्डेय यांनी त्यांना तडकाफडकीने ” निलंबनाची” भेट दिली !!!

                                     

 नाशिक  : नाशिक शहरातील डी के नगर पोलीस चौकीतील घडलेला हा त्या पोलिसांचा पोलीस प्रशासनास ” काळीमा ” लावणारा आणि ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या ब्रीद वक्यास ” बट्टा ” लावणारी आणि जनतेत चीड व्यक्त करणारी घटना घडल्याने त्या पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. मात्र पोलीस आयुक्त  दीपक पाण्डेय यांनी त्या ” मदिरा पिसाट ” पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्याची भेट दिल्याने असा कर्तव्य दक्ष अधिकारी असणे खूपच गरजेचे आहे अशी जनतेत चर्चा रंगू लागली आहे.कारण 


नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात ” मटका” सारख्या अवैध धंद्याने सुद्धा खूपच ” बाळसे ” पकडल्याने पोलिसांचे फावले आहे मग सर्रासपणे आणि राजरोसपणे ” मदिरा ” ( दारू ) शी प्रेम करून पोटात घालण्याचा प्रकार घडतो का? हे अवैध धंदे संबंधित पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हरामाचा ” हप्ता ” घेत असणारच म्हणून हा मटका आणि मटका वाला पोसला जातो का ? तर हा धंदा विना सरकारी रजिस्ट्रेशन ने सर्रासपणे सुरू असतो याला कारण नेमके काय ? 


असणार आमचे कर्तव्य दक्ष पोलीस की पोलीस अधिकारी ? मग आली की नाही ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” ह्या तत्वाशी ” गद्दारी ” का करतात गद्दारी गव्हर्मेंट पगार जास्त देते म्हणून की कमी देते म्हणून ? हेच काही कळत नाही .                                    नाशिक शहरातील  डिके नगर गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पोलीस चौकीत रात्री ११ वाजेच्या सुमारास ४/५ पोलीस कर्मचारी ” मदिराशी ” ( दारू ) प्रेम करताना आढळून आले आणि हे प्रेम इतके की मदिरा तोंडात जाऊ लागली ते ही ऑन ड्युटी वर .जेव्हा पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्या साठी नागरिक गेले असता हा प्रकार उघडकीस आला.  


याचाच अर्थ पोलीस प्रशासनातील असे काही ” मदिरा ” चे घोट पचविनाऱ्या मदिरा ” पिसाटानी ” आणि अवैध मटका सारख्या धंद्यांना वाट मोकळी करून देऊन स्वतःचे पोट कल्याण करून दुसऱ्यांच्या घराची म्हणजेच कुटुंबांची वाट लावणाऱ्या पोलीस आणि अधिकाऱ्यांनी आप ल्या जबाबदारीचे व कर्तव्याचे “भान ” विसरून ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” ह्या महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्याशी गद्दारी करून त्याची वाट लावण्याचा प्रकार सर्रासपणे घडल्याचे दिसते आहे. या ब्रीद वाक्याचा अर्थ सर्व सामान्य जनतेला पुरेपूर माहीत नसला तरी पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना याचा अर्थ नक्कीच माहीत असला पाहिजे हा विश्वास आहे.आणि याबाबत शंका ही नाही.


तरी सांगावेसे वाटते ह्या वाक्याचा अर्थ असा की ” महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबध्द आहे”.पण येथे मात्र उलटेच घडले पोसिस मदिराचे घोट रिचवून खूपच सज्जन झाल्याचे आढळून आले.शिंदे नामक नागरिक टवाळखोर पोरांची तक्रार देण्या साठी डी के नगर पोलीस चौकीत गेले तेव्हा ४/५ पोलीस कर्मचारी दारू ( मदिरा) चा आस्वाद घेताना अजून आले. त्यांनी लगेच आपल्या मोबाईल वरुन चित्रीकरण केले.दारू पिऊन पिसाटलेल्या पोलिसांना संताप अनावर झाला आणि शिंदे यांना मारहाण करीत तेथून पळ काढला.


याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्याने कर्तव्य दक्ष अधिकारी पाण्डेय यांनी तात्काळ दखल घेऊन तडका फडकिने त्या पिसाटलेल्या पोलिसांना निलंबित केले . अशा कर्तव्य दक्ष आयुक्तांची शहरात एकच चर्चा रंगू लागली असे अधिकारी नाशिक शहरासह जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात मिळाल्यास नागरी नक्कीच भय मुक्त जीवन जगून खरच सुरक्षित राहतील.

Post a Comment

0 Comments