जगातील सर्वात धोकादायक सिरीयल किलर, ज्याने एका रुमालाने 900 लोकांची केली हत्या
अशा अनेक सिरीयल किलर्सची नावे मानवी इतिहासात नोंदलेली आहेत, ज्यांनी निर्दयीपणे लोकांना क्रमा-क्रमाने मारले आणि लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणी या सिरीयल किलरचे नाव ऐकते तेव्हा तेव्हा त्याच्या मनात भीती दाटून येते. संपूर्ण जगाचा इतिहास पाहिला तर अशा सीरियल किलर्सच्या अनेक कहाण्या आहेत.
सीरियल किलर लोकांना निर्दयीपणे मारण्यासाठी दगड, चाकू, कुऱ्हाडी यासारख्या धोकादायक शस्त्रांचा वापर करतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की एखाद्या सिरीयल किलरने फक्त रुमालाचा साहायाने लोकांना मारले आहे, तेही एक-दोन नाही तर 900 च्या वर लोक मारले गेले.
‘ठग बहराम’ असे या सीरियल किलरचे नाव असून त्याने रुमालाच्या सहाय्याने 900 हून अधिक लोकांची हत्या केली होती. ठग बहरामचा जन्म 1765 मध्ये झाला. 1790 ते 1840 पर्यंत त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. त्या काळात भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार होता. ठग बहरामची दहशत इतकी होती की इंग्रज सरकारही त्याला घाबरत होते.
बहराम ज्या वाटेने जात असे, त्यावरून प्रेतांचा ढीग पडत असे म्हणले जाते. त्यादरम्यान, ठग आणि डाकुंवर काम करणाऱ्या जेम्स पॅटननेही ठग बहरामबद्दल लिहिले की, त्याने प्रत्यक्षात 931 लोकांची हत्या केली होती आणि त्याने त्याच्यासमोर या हत्यांची कबुली दिली होती. बहरामची टोळी व्यापारी, पर्यटक, सैनिक आणि यात्रेकरूंच्या ताफ्यांना आपली शिकार बनवत असे आणि टोळीतील लोक त्यांच्या वेशात सामील होत असे. त्यानंतर हे लोक रात्री झोपले की मग ही टोळी लोकांना आपला शिकार बनवायची.
बहराम टोळीबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा व्यापाऱ्यांचा ताफा झोपलेला असतो, तेव्हा टोळीचे सदस्य कोल्ह्याच्या रडण्याच्या आवाजात एकमेकांना सिग्नल पाठवत असत. यानंतर, बहराम टोळीच्या इतर मेम्बरसह तेथे पोहोचत असे आणि पिवळ्या कापडाच्या तुकड्याने कि ज्यात धारदार नाणे असायचे त्याद्वारे ताफ्यातील लोकांचा गळा दाबून खून करत असे. त्यानंतर ते लोकांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावत असे. लोक सतत गायब झाल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि 1809 मध्ये कॅप्टन स्लीमन या इंग्रज अधिकाऱ्यावर याची जबाबदारी देण्यात आली.
कॅप्टन स्लीमनने चौकशी केल्यावर उघड झाले की हे काम ठग बहरामची टोळी करत आहे आणि तेथे लोकांना मारून त्यांचे मृतदेह देखील गायब करतात. ठग बहरामच्या टोळीत जवळपास 200 लोक असल्याचे कॅप्टन स्लीमनने सांगितले होते. कॅप्टन स्लीमनने दिल्लीपासून जबलपूरपर्यंत हेरांचे मोठे जाळे विणले होते. यानंतर मग त्यांच्या टोळीची भाषा त्यांनी समजून घेतली. ठगांनी रामोसी भाषा वापरल्याचा खुलासा कॅप्टन स्लीमनने केला. बहरामच्या टोळीने लोकांना संपवताना ही भाषा वापरली. मात्र, 10 वर्षांनंतर बहरामला अटक करण्यात आली. बहरामला अटक झाली तेव्हा तो 75 वर्षांचा होता. 1840 मध्ये बहरामला फाशी देण्यात आली.
0 Comments