सांगोला तालुक्यातील सोनंदजवळ भीषण अपघातात तिघे ठार
…. या गावचे तीन युवक आपल्या बुलेटवरून सांगोला तालुक्यातील सोनंद येथील सय्यदबाबा दर्गाहच्या दर्शनासाठी निघाले होते. ते सोनंद गावाजवळ आले असता ट्रेलर आणि बुलेटमध्ये भीषण अपघात झाला. बुलेट आणि ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाल्याची घटना सांगोला तालुक्यातील सोनंद गावाजवळ शुक्रवारी घडली आहे. अपघातातील मृत हे पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावचे आहेत. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झाली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावचे तीन युवक आपल्या बुलेटवरून सांगोला तालुक्यातील सोनंद येथील सय्यदबाबा दर्गाहच्या दर्शनासाठी निघाले होते. ते सोनंद गावाजवळ आले असता ट्रेलर आणि बुलेटमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
अंगावर शहारे आणणारे दृश्य
अपघात स्थळाचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. तिघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. एकजण जागीच ठार झाला. उर्वरित दोघेजण गंभीर अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.या अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नाहीत. सांगोला पोलीस ठाण्यात अद्याप या अपघाताची नोंद झाली नव्हती.
0 Comments