पुढील काळात शेतकरी , कष्टकरी व सामांन्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही - डॉ . भाई बाबासाहेब देशमुख
सांगोला ( प्रतिनिधी ) : शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या सांगोला माध्यमातुन तालुक्याबरोबरीने संपुर्ण राज्यभर सामांन्यांच्या प्रश्नासाठी आमदार भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करुन जनसामांन्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे .
पुढील काळात सर्व सामांन्यावरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचेपुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ . बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले . यावेळी डॉ . बाबासाहेब देशमुख म्हणाले की , भाई चंद्रकात ( दादा ) देशमुख , डॉ.अनिकेत देशमुख , भाई बाबासाहेब करांडे व दादाशेठ बाबर व सर्व जि.प.सदस्य , पंचायत समिती सदस्य ,
विविध संस्थांचे चेअरमन यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या मोर्चामधील इतर विषयांबाबत तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गासोबत आपणलवकरच बैठक घेऊन बाकीच्या मागण्याबाबतही लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत . तसेच येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या , कष्टकऱ्यांच्या , कामगारांच्या व लहान मोठ्या न्याय व्यवसाईकांच्या मागण्यासाठी आमचा लढा कायम चालु ठेवणार आहोत .
या भव्य मोर्चाची माहिती आमदार भाई जयंतभाई पाटील यांना कळविण्यात आली . त्यांनी सांगोल्यातील शेतकऱ्यांच्याविजेचा प्रश्नाबाबतच्या मोर्चाची माहिती संबंधीतांना दिली . परिणामी विजमंत्र्यालाही काही महिन्यासाठी विजतोडणी थांबवण्याचे आदेश द्यावे लागले . हा शेतकरी कामगार पक्षातील लढाऊ शेतकऱ्यांचा व कामगारांचा विजय असल्याचेही डॉ.बासाहेब देशमुख यांनी सांगितले असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली .
0 Comments