साखर कारखाने विक्री व्यवहारात घोटाळा नाही’: अजित पवारांनी केले स्पष्ट
मुंबई: राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात कारण नसताना गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्री व्यवहाराची राज्य गुप्त वार्ता विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीचे आदेश दिले आहे. या तिन्ही चौकशीत या निर्णयात काहीही गैर आढळले नाही. या प्रकरणात समाजाला वस्तुस्थिती काय आहे हे कळू द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार असे काल विधानसभेत बोलले आहेत.
सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेला गैरव्यवहाराचा मुद्दा अण्णा हजारे यांनी या अगोदरही केला होता. त्यामुळे सहकार मंत्र्यांनी अण्णा हजारे यांना जाऊन भेटावे व यंत्रणामार्फत कोणकोणत्या चौकशा सरकारने केल्या याची माहिती देऊन त्यांचे समाधान करावे, असा आदेश पवार यांनी दिला.
या विक्री व्यवहाबाबत न्यायाधीश जाधव यांच्या चौकशीतही काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहे. ही चौकशी सुरू असल्याचे सांगत असताना आतापर्यंतच्या चौकशांमध्ये काहीही निष्पन्न झालेले नसल्याचे पवार यांनी सांगितले. एखादा कारखाना विक्रीला निघाल्यानंतर राज्य सहकारी बँक तो चालवायला देते.
ज्यांना कुणाला कारखाने चालवायचे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जावे आणि परिस्थिती पाहावी. लोक टीका करतात, पण कारखाना चालवायला कुणीही पुढे येत नाही. विरोधी पक्षनेते, सभागृहातील सदस्य तसेच देशपातळीवरच्या नेत्यांचा मोठा गैरसमज झाला आहे असे जोरादार भाष्य पवारानी केले आहे.

0 Comments