google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शाळेत घुसून मुलीवर केला चाकूने हल्ला!

Breaking News

शाळेत घुसून मुलीवर केला चाकूने हल्ला!

 शाळेत घुसून मुलीवर केला चाकूने हल्ला!

पुणे: पुण्यातील वडगाव शेरी येथील शाळेत घुसून एका तरुणाने दहावीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीवर चाकूने  वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावशेरी येथील एका शाळेत आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. शाळेमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक एक मुलगा जबरदस्तीने शाळेच्या आवारात आला. त्यानंतर त्याने एका मुलीवर चाकूने  वार केले. कोणाला काही कळण्याआधीच आरोपी या मुलीवर हल्ला करुन फरार झाला. 


या घटनेत ती मुलगी खूप  जखमी झाली असून तिला लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या हल्ल्याचे अजूनही नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलीस सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या आधारे या तरुणाचा शोध घेत आहेत

Post a Comment

0 Comments