google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात १७१ बोगस शिक्षक !

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात १७१ बोगस शिक्षक !

 सोलापूर जिल्ह्यात १७१ बोगस शिक्षक !

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी १५ जणावर दोषारोप पत्र  न्यायालयात सादर केले असतानाच राज्यातील बोगस शिक्षकांची आकडेवारीच एका वाहिनीने जाहीर केली असून त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात १७१ बोगस शिक्षक असल्याचे समोर आले आहे. 


राज्यात बोगस डॉक्टर असल्याचे सर्वांनाच माहित आहे पण आता नवी पिढी घडविणारे शिक्षक देखील बोगस असल्याचे धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराने शिक्षण क्षेत्र हादरून गेलेले असून अनेक बडे मासे कायद्याच्या गळाला लागले आहेत. मोठी रक्कम घेवून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपले हात काळे केले आहेत. त्यामुळे पैसे देवून मास्तर झालेल्यांची यादी तयार करण्यात आली असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रचंड चर्चेचा बनला असतानाच आज एका वृत्त वाहीनीने राज्यातील बोगस शिक्षकांची जिल्हानिहाय आकडेवारीच दिली आहे. 


सदर वृत्तानुसार राज्यातल्या विविध जिल्ह्यात ७ हजार ८८० बोगस शिक्षक कार्यरत असून त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे या वाहीनीने मिळवली आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात १७१ शिक्षक बोगस असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Bogus Teachers)  पुणे जिल्ह्यात ३९५ बोगस शिक्षक असल्याचे या वाहिनीने म्हटले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात १२६ तर सातारा जिल्ह्यात ५८, सांगली - १२३ बोगस आहेत. लातूर जिल्ह्यात १५७ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४६ शिक्षक बोगस असल्याचे समोर आले आहे.  नाशिक जिल्ह्यात १ हजार १५४, धुळे १ हजार २, नंदुरबार - ८०८ अशी मोठी संख्याही काही जिल्ह्यातून समोर आली आहे. 


शिक्षक हा  अत्यंत महत्वाचा घटक असून देशाची उद्याची पिढी घडविण्याचे महान आणि आव्हानात्मक काम शिक्षक करीत असतो. पण शिक्षकच बोगस असेल तर नवी पिढी कशा प्रकारची घडू शकेल हे वेगळे सांगण्याचीही आवश्यकता उरलेली नाही. शासन आणि विद्यार्थी यांचीही फसवणूक करणाऱ्या या बोगस शिक्षकांचे बिंग आता फुटले असून शिक्षण क्षेत्राला देखील हादरा बसला आहे.

Post a Comment

0 Comments