लक्ष द्या ! सोलापुरात बुधवारपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लसीकरण
सोलापूर : भारतातील 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोरूना प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या सूचना प्राप्त झाले असून त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या वतीने बुधवार 16 मार्च पासून सोलापुरातील महानगरपालिकेच्या पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाला सुरुवात होणार आहे याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे यांनी माहिती दिली.
भारत सरकार ने दिलेल्या मार्गदर्शक सूचना नुसार उद्या दि.16 मार्च 2022 पासून शहर व जिल्ह्यातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. या वयोगटासाठी corbevax ही लस देण्यात येणार असून 28 दिवसानंतर या लसीची दुसरी मात्रा देण्यात येईल.
मनपाच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात व रेल्वे हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल तसेच राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात हे लसीकरणऑनलाइन तसेच onspot पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बुधवारी या मोहिमेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत दाराश्या नागरी आरोग्य केंद्र येथे करण्यात येणार आहे. या वयोगटातील सर्व मुलामुलींचे लसीकरण पालकांनी अवश्य करून घ्यावे, असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहारे यांनी केले आहे. 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 या काळात जन्म असणारी मुली मुले या लसीकरणासाठी पात्र आहेत.

0 Comments