वीज तोडणी तूर्तास थांबविण्याची मोठी घोषणा !
मुंबई : वीज तोडणी मोहिमेमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून वीज तोडण्याची कारवाई तूर्तास थांबविण्याची घोषणा राज्याचे उर्जामंत्री नितीन राउत यांनी केली आहे .उन्हाळ्याचे दिवस सुरु असताना आणि पिकांना पाणी देण्याची गरज असताना महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटाचा लावला आहे त्यामुळे शेतकरी संतप्त आणि अस्वस्थ देखील आहे . एकीकडे पिकांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे
अनेक पाणी पुरवठा यंत्रणांचा देखील वीज पुरवठा तोडण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे . राज्यात ठिकठिकाणी शेतकरी विजेसाठी आक्रोश करीत आहेत पण महावितरण ( Mahavitaran ) मात्र वीज पुरवठा तोडण्याच्या कामात व्यस्त आहेत .जनतेचा रोष वाढीला लागल्याने शासनाला नमते घेण्याची वेळ आलेलीच होती , त्यात आज विरोधी पक्षाने विधानसभेत ही मागणी लावून धरली .
आजच्या आज वीज तोडण्याची मोहीम थांबविण्याची घोषणा करावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत होती . राज्यात देखील शेतकरी आंदोलन करीत आहेत . आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत आहेत . या पार्श्वभूमीवर वीज तोडणी मोहीम तूर्त थांबविण्याबाबत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे . यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .
थकबाकीमळे वीज परवठा खंडितथकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शेतकरी वर्गाचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाणार असून पीक शेतकऱ्यांच्या हातात येईपर्यंत वीज तोडणीची मोहीम तीन महिन्यांसाठी थांबवली असल्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले आहे . बँकांचे कर्ज असल्याने महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे .
महावितरण ही शासनच्या मालकीची कंपनी आहे , शासनाकडून मिळणारे अनुदान , वीज बिलाचे मिळणारे पैसे हेच उत्पन्नाचे साधन आहे . ६४ हजार कोटी एवढी थकबाकी आहे त्यातील शेती पंपाची थकबाकी ४४ हजार• ९ २० कोटी रुपये आहे त्यामुळे सरकार काही मुद्दाम वीज खंडित करीत नाही . मागच्या सरकारने शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत .
विजेचाही तुटवडा झाला तरी भार नियमन होऊ दिलेले नाही . शेतकरी करीत असलेल्या मागणीचा विचार करतो पण महावितरणचा देखील विचार करावा असे यावेळी बोलता राऊत म्हणाले . शेतकऱ्यांची वीज तोडनी आम्ही थांबवत आहोत पण सवलत दिली असली तरी शेतकऱ्यांनी वेळेत बिले भरवित असे आवाहन देखील उर्जामंत्री यांनी केले आहे .

0 Comments