google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोनिया गांधींचे पाच राज्यांच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश!

Breaking News

सोनिया गांधींचे पाच राज्यांच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश!

 सोनिया गांधींचे पाच राज्यांच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश!

नवी दिल्ली: मागील काही दिवसांत पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर आणि पंजाबमधील सत्ता गमावल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही जोरदार पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. कारण, सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणूक झालेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या पीसीसी अध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या पीसीसी अध्यक्षांना पीसीसीची पुनर्रचना सुलभ करण्यासाठी त्यांचे राजीनामे देण्यास सांगितले आहे,” असे काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून सांगितले आहे.


पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या जोरदार फटक्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक रविवारी झाली होती. या बैठकीत पक्षनेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपद स्वीकारावे, असे म्हणण्यात आले. परंतु, 


आता सोनिया गांधी यांच्याकडेच अध्यक्षपद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे गांधी कुटुंबाच्या मदतीला धावून आलेले दिसून आले. या पराभवासाठी त्या एकट्या नाहीत तर राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत, असे खरगे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments