google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघात ! ट्रकने दिंडीच्या ट्रॅक्टरला उडवले सात जण जागीच ठार 40 जण गंभीर जखमी

Breaking News

भीषण अपघात ! ट्रकने दिंडीच्या ट्रॅक्टरला उडवले सात जण जागीच ठार 40 जण गंभीर जखमी

 भीषण अपघात ! ट्रकने दिंडीच्या ट्रॅक्टरला उडवले सात जण जागीच ठार 40 जण गंभीर जखमी



सोलापूर : सोलापूर पुणे रोडवरील लांबोटी नजीक एका ट्रॅक्टर मध्ये पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील भाविकांवर काळाचा घाला पडला. एका ट्रकने या ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने ट्रॅक्टर सुमारे एक हजार फुट फरफटत गेले यामध्ये सात जण जागीच ठार झाले तर सुमारे 35 ते 40 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटना रात्री 9 वाजता कोंडी व केगाव मध्ये बलदवा पेट्रोल पंपाजवळ घडली. त्याठिकाणी पाहिले असता जखमी आणि मृत्यूचा ढिगारा लागल्याचं दुर्दैवी चित्र होतं.


एम एच 12 TV 7348 असा ट्रक नंबर आहे. मयत आणि जखमी हे सर्वजण तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी इथले असल्याची माहिती समोर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी इथले भाविक पंढरपूरला एकादशीनिमित्त दर्शनाला एका ट्रॅक्टर मध्ये जात होते सोलापूर कडून मोहोळ मार्गे पंढरपूरला जात असताना ट्रॅक्टर कोंडी ते केगाव च्या दरम्यान आला असता पाठीमागून ट्रकने इतकी जोराची धडक दिली की ट्रॅक्टर सुमारे एक हजार फूट फरफटत गेले, 


तब्बल सात जण जागीच ठार झाले तर  35 ते 40 जण गंभीर जखमी झाले आहेत. सुमारे दोन तास मदतकार्य सुरू होते अकराच्या सुमारास मयत आणि जखमींना सिव्हिल हॉस्पिटल कडे पाठवण्यात आले आहे . ट्रॅक्टर चा चुराडा झाला असून त्याचा नंबर सुद्धा दिसत नाही असेच चित्र घटनास्थळी होते

Post a Comment

0 Comments