सांगोला : येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महावितरणचे उपअभियंता आनंद पवार यांना निवेदन
देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी . वीज तोडणी थांबविण्याची राष्ट्रवादीची मागणी
सांगोला , ता . १२ ऐन उन्हाळ्यात महावितरण प्रशासनाने कृषिपंपांची विद्युत तोडणी हाती घेतल्याने पिण्याच्या पाण्याची व फळबागा जतन करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे . महावितरण प्रशासनाने विद्युत तोडणी तात्काळ थांबवावी , अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल ,
असा इशारा लेखी निवेदनाद्वारे महावितरण प्रशासनाला देण्यात आला .राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील यांच्या सूचनेनुसार गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महावितरण प्रशासनाला दिले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तानाजी पाटील , शिवाजी बनकर , तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे ,
युवकचे तालुका अध्यक्ष अनिल खटकाळे , चंद्रकांत शिंदे , सखुबाई वाघमारे ,शुभांगी पाटील , सुजाता कांबळे , संगीता वाघमारे , अनिल खडतरे , सोमनाथ लोखंडे , विजय पवार , नंदकुमार दिघे , विनोद रणदिवे , दादा घाडगे , सूर्यकांत आदाटे , सुशांत ऐवळे , धनंजय पवार , अरुण पाटील , देवा लोखंडे , पांडुरंग पाटील , साहेबराव पाटील , माजी नगरसेवक आलमगीर मुल्ला , प्रताप मस्के , संभाजी हरिहर , किरण पवार , रामचंद्र पवार , प्रवीण खडतरे ,
निलेश खडतरे , सचिन जांगळे , पवन खाडे ,सुनील पाटील , राहुल खडतरे , प्रशांत खडतरे , चंद्रकांत खडतरे , सिताराम इंगोले , सोपान जाधव , अजित माने , भारत सुरवसे , विशाल जाधव , नवनाथ पवार , नितीन साळुंखे , दादासाहेब खडतरे , पोपट केदार , अनिल केदार , गोरखनाथ साळे , श्रीकांत इंगोले , बापू राजगुरू , सुनील मोरे , बसवेश्वर आधाटे , विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सुरवसे , ऋषिकेश शिंदे आदी संख्येने उपस्थित होते .

0 Comments