google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार संजयमामा व आमदार प्रशांत मालकांकडे जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा ; यापुढे स्थानिक निवडणुका एकत्रित

Breaking News

आमदार संजयमामा व आमदार प्रशांत मालकांकडे जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा ; यापुढे स्थानिक निवडणुका एकत्रित

  आमदार संजयमामा व आमदार प्रशांत मालकांकडे जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा ; यापुढे स्थानिक निवडणुका एकत्रित



सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या निमगाव इथल्या फार्महाऊसवर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी जिल्हा दूध संघाची निवडणूक सर्वांनी एकत्रित येऊन बिनविरोध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात मोहिते-पाटील गट वगळता सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन यापुढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचे नियोजन झाले. विधानसभा निवडणुक मात्र आपापल्या पक्षाकडून लढवण्यात येणार आहे. दूध संघासाठी 17 जागा वाटपाचे नियोजन झालेले असून यावर येत्या 12 फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृहावर सर्व नेते एकत्र येऊन बैठक होईल त्या त्या तालुक्यातील नेत्यांनी आपल्या समर्थकांना अर्ज माघार घेण्यास सांगावे असे ठरल्याचे समजते.मधल्या काळात विस्कटलेली घडी आता पुन्हा बसवण्याकडे सर्व नेत्यांची पावले वळली आहेत. ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या फळीतील नेते आमदार संजयमामा शिंदे,आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे नेतृत्व राहील. त्यांना सोबत माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, चंद्रकांत देशमुख, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, भगीरथ भालके यांची साथ असेल असे ठरले असल्याचे सांगण्यात आले.मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, मोहोळचे विजयराज डोंगरे, यांच्या भूमिका जरी स्पष्ट झाल्या नसल्या तरी ते या ग्रुपला सोडून जाणे सुद्धा शक्य नाही. मोहिते पाटील गटाला सोडून पुन्हा समविचारी आघाडीची जुळवाजुळव होत असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments