केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले यांचा १४ फेब्रुवारी रोजी सांगोला दौरा सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित रहावे : तालुकाध्यक्ष खंडू ( तात्या ) सातपुते
सांगोला / प्रतिनिधी सांगोला या ठिकाणी केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदासजी आठवले १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ : ३० वाजता भीमनगर , ता . सांगोला येथे आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामस्वरूप बनसोडे यांचे वडील दिवंगत दगडू बनसोडे यांची निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन , ठीक सकाळी १०:०० वाजता आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष दिवंगत अंबर मारुती काटे यांच्या निधनाबद्दल यलमार.मंगेवाडी येथे काटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत .
व यानंतर पुढे मंगळवेढाकडे रवाना होणार आहेत . त्यांच्यासमवेत आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा . राजाभाऊ सरवदे यांच्यासह तालुका व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत . अशी माहिती सांगोला तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते यांनी दिली आहे .
0 Comments