google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुलाच्या समोरच महिलेवर सामुहिक अत्याचार,

Breaking News

मुलाच्या समोरच महिलेवर सामुहिक अत्याचार,

 मुलाच्या समोरच महिलेवर सामुहिक अत्याचार, 


आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्यातुला व तुझ्या मुलाला कंपनीत कामाला लावून देतो ,


 असे सांगत सदर महिलेला तब्बल दीड महिना क्रांती चौक परिसरातील खोलीमध्ये डांबून दोघांनी तिच्या मुलासमोरच आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे . मिळालेल्या माहितीनुसार , आरोपी संभाजीने एका महिला व तिच्या मुलाला कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते .


 त्यानुसार आरोपी संभाजीने महिलेला 26 नोव्हेंबर 2021 रोजी मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे गेट नंबर 56 येथे बोलावून घेतले होते . त्यानंतर कंत्राटदार असलेला संभाजीने महिलेसह तिच्या मुलाला रिक्षामध्ये बसवून त्या दिवशी शेंद्रा MIDC येथील एका कंपनीमध्ये काम दिले . 


काम संपल्यानंतर महिलेला आणि मुलाला घरी सोडतो म्हणून स्वतःच्या गाडीत बसवले . पण त्या महिलेला तिच्या घरी न नेता क्रांती चौक परिसरातील एका खोलीवर नेले . त्यानंतर त्या खोलीवर पीडित महिलेवर कंत्राटदार संभाजी आणि त्याच्या एका मित्राने तब्बल दीड महिने अत्याचार केले . पीडित महिलेने व तीच्या मुलाने 


15 जानेवारी रोजी संभाजी याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले , त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता . त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यास पोलीस कोठडी देण्यात आली आहे . या लज्जास्पद प्रकाराची माहिती बाहेर येताच लोकांमधुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Post a Comment

0 Comments