google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सरकारने “लाभार्थीच्या- घरकुल योजना जाचक अटी शिथील कराव्यात” सांगोला- डाँ बाबासाहेब देशमुख

Breaking News

सरकारने “लाभार्थीच्या- घरकुल योजना जाचक अटी शिथील कराव्यात” सांगोला- डाँ बाबासाहेब देशमुख

 सरकारने “लाभार्थीच्या- घरकुल योजना जाचक अटी शिथील कराव्यात” सांगोला- डाँ बाबासाहेब देशमुख


पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गरीब नागरीकांना निवारा मिळावा म्हणुन जी घरकुल योजना आहे त्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावण्यासाठी ज्या कागदपत्रांची व अटीची पुर्तता करावी लागत आहे व काही जाचक अटी लावलेल्या आहेत ते पाहील्यावरती ही योजना घरे देण्यासठीची आहे की गरीबांना घरापासुन दुर ठेवण्यासाठी आहे हेच समजेना झाले आहे.अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.


एकतर सामांन्य नागरीकांना गेले अनेक दिवस झाले निसर्गाच्या अवकृपेने म्हणजे कधी दुष्काळ तर कदी अतीवृष्ठी अशा मुळे ते मुळचेच हैराण झाले आहेत ते पुर्णता आर्थिक संकटात असताना सरकारच्या काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना आशा काही जाचक अटि व नियमाशी सामना करावा लागत आहे की त्या योजनेचा लाभ घेण्याऐंवजी ते लाभार्थी योजनांपासुन दुर ठेवले जातात की काय आसे वाटते आहे.


नागरीकांना जगण्यासाठी अन्न,वस्त्र व निवारा ह्या मुलभुत गरजांची आवशक्यता आहे त्यातील निवारासाठीच्या ज्या घरकुल योजना आहेत त्या योजनांचा लाभ घ्यायचाआसेल तर घरामध्ये दुचाकी आसेल तर त्याला घरकुल योजनेचा लाभ मीळणार नाही.तसेच घरामध्ये फक्रीज आसेलतर घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही.घरामध्ये साधा दुरध्वनी आसेलतरीही घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही.ज्यांची महीन्याची कमाई 10 हजार रुपये आहे त्यांनाही घरकुल योजनेचा लाभ मीळणार नाही.आशा आनेक अटि ह्या घरकुल योजनेसाठी लावलेल्या आहेत.


ज्या मजुराला रोज 350/- रुपये प्रती दिनी पगार आसेल तर त्याचीही महीन्याची कमाई साडे दहा हजार होते आशा मजुरालाही घरकुल योजनेपासुन दुर राहवे लागत आहे.दुसरी महत्वपुर्ण गोष्ठ एखाद्या मजुराला कामासाठी पाच दहा किलोमिटरवरती कामाला जावे लागत आसते त्याला दुचाकीशिवाय पर्याय नाही प्रत्येक ठिकाणी मजुराला कामाला जाण्यासाठी तुमच्या सरकारी वाहनांची सुवीधा आजुन निर्माण झालेली नाही त्यांना दुचाकीशिवाय पर्याय नाही ह्याचा विचार सरकारने करावा.


दुसरी एक महत्वपुर्ण अट आहे ती म्हणजे घरात कसलाही दुरध्वनी नसावा एकतर लाभार्थ्यांना आपण लाभ देत आसताना दुरध्वनीची अट घालता व दुसरीकडे डिजीटल इंडीयाच्या नावाखाली आँनलाईन व्यवहाराला प्रोस्ताहन देता हा प्रकार लक्षात येण्यासारखा नाही का?


सरकारने लोकांना निवारा मिळावा हा एकच ऊद्देश ठेऊन घरकुलासारख्या महत्वपुर्ण योजना लाभार्थ्यांना मिळल्या पाहीजेत ह्याची खबरदारी घ्यायला पाहीजे.लोकांना लाभ मिळाला पाहीजे लाभापासुन नागरीक वंचीत राहता कामा नयेत त्यासाठी सरकारने घरकुलासाठीच्या जाचक अटि रद्द कराव्यात आशी मागणी पुरोगामीचे प्रदेशाध्यक्ष डाँ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी bhinrajnews. com ला दिली आहे.

Post a Comment

0 Comments