google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील एसटी विलीनीकरणासंदर्भात आताची सर्वात महत्त्वाची बातमी!

Breaking News

राज्यातील एसटी विलीनीकरणासंदर्भात आताची सर्वात महत्त्वाची बातमी!

 राज्यातील एसटी विलीनीकरणासंदर्भात आताची सर्वात महत्त्वाची बातमी!



मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून एसटी कर्मचारी हे संपावर आहेत. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी हा संप अजूनही सुरु आहे. एसटी महामंडळ बरखास्त करून राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. तर काही कर्मचारी पुन्हा सेवेत रुजु झाले आहेत. पण काही कर्मचारी हे अजूनही विलीनीकरणावर ठाम आहे. दरम्यान या एसटी संपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.


अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या संपामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्य सरकारने खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, खासगी वाहतूक करणारे अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याने प्रवाशांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


राज्य सरकारला न्यायालयात एसटी विलीनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी वाढीव वेळ हवा आहे. यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.


याआधी न्यायालयाने राज्य सरकारला हा अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांचा वेळ दिला होता. मात्र तो वेळ आता संपला आहे. मात्र त्यांनतरही राज्य सरकारला हा अहवाल सादर करण्यासाठी वेळ अपुरा ठरतोय. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयात वेळ वाढवून द्यावा, असा अर्ज केला आहे


दरम्यान या अर्जावर आज शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर आज सुनावणी झाली, तर न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

Post a Comment

0 Comments