वीज बिलातील सवलत ३१ मार्चपर्यंत मिळणार !
सोलापूर : जिल्ह्यात महावितरणची थकबाकी पाच हजार कोटींची असून ६५ टक्के सवलत देऊन वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सवलत मात्र ३१ मार्च पर्यंतच देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या काळापासून महावितरणची प्रचंड थकबाकी थकली आहे आणि तिच्या वसुलीसाठी गेल्या काही महिन्यांपासून महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे. असंख्य ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहेत तर ग्राहकातून देखील प्रच नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
त्यात कृषी पंपाची थकबाकी तर विलक्षण असून काहीही करून ती वसुली करण्याचा महावितरणाचा प्रयत्न आहे. राज्यातील कृषी पंपाची थकबाकी ६० हजार कोटींवर गेली आहे त्यामुळे महावितरण अडचणीत येताना दिसत आहे. काहीही करून ही थकबाकी वसूल करण्याच्या प्रयत्नात महावितरण असून त्यासाठी सवलत देखील देण्यात आली आहे.
कृषीपंपाची सोलापूर जिल्ह्यातील थकबाकी पाच हजार कोटीवर गेली आहे. कृषी पंप वीज धोरणानुसार येत्या मार्च अखेरीस ६०० कोटींची थकबाकी वसूल होईल. सवलतीची मुदत ३१ मार्च रोजी संपत असल्याने मुदतीत थकबाकी जमा करून सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शेतकऱ्याकडील थकबाकी वसुली करण्यात अडचणी येत
असल्यामुळे शासनाने मदत करावी असा प्रस्ताव महावितरणकडून अनेकदा शासनास गेला आहे परंतु कोरोनामुळे या प्रस्तावाचा अद्याप विचार झालेला नाही. या प्रस्तावावर शासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. महावितरणची शेतकरी बांधावाकडील थकबाकी मात्र वाढतच गेली आहे त्यामुळे महावितरण आर्थिक अडचणीत येऊ लागले आहे.
महावितरणने थकबाकी वसुली करण्यासाठी एक आराखडा तयार केलेला असून त्यानुसार ३१ मार्च २०२२ पर्यंत थकबाकीदार शेतकरी यांना ६५ टक्के सवलत देऊन त्यांच्याकडून थकबाकी वसूल करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याकडे पाच हजार कोटींची थकबाकी असून सवलतीच्या योजनेत एक हजार सहाशी कोटी जमा करावे लागणार आहेत. गेल्या वर्षात फक्त दोनशे कोटींचीच वसुली झाली
असल्याने महावितरण या वसुलीसाठी गतिमान झाले आहे. त्यामुळेच थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. ३१ मार्च पर्यंत सवलत असून त्यानंतर मात्र थकबाकीदार यांचा वीज पुरवठा बंद केला जाणार असून आता केवळ ४१ दिवसांचाच अवधी शिल्लक राहिला आहे.

0 Comments