google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हिंगणघाट अंकिता नामक शिक्षिकेला – जाळून मारणाऱ्या विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा”..

Breaking News

हिंगणघाट अंकिता नामक शिक्षिकेला – जाळून मारणाऱ्या विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा”..

 हिंगणघाट अंकिता नामक शिक्षिकेला – जाळून मारणाऱ्या विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा”.. 



घडलेल्या घटनेनुसार अंकिता नामक शिक्षिका हिंगणघाट मुलीला भर चौकात जाळले होते,तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार 3 फेब्रुवारी 2020 रोजी घडला होता. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होतो. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

प्रकरण काय?


3 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी एका महिलेचा ‘वाचवा… वाचवा’ असा आवाज आल्याने कुणाचा तरी वाहनाने अपघात झाला असावा याचा अंदाज घेत परिसरातून जाणारे विजय कुकडे यांनी आपली दुचाकी थांबवली.


“ती वेदनेनं विव्हळत होती. तिचा श्वासोच्छवास संथ झाला होता आणि श्वास घेतानाही तिला त्रास होत होता. आगीच्या ज्वाळांमुळे तिचे डोकं, मान आणि चेहरा जळून गेला होता. अशाच अवस्थेत एका लहान शाळकरी मुलीच्या स्वेटरच्या मदतीनं तिच्या शरीरावरील आग विझवून तिला हॉस्पिटलला नेण्यात आले. ही घटना आयुष्यात कधीही विसरता येणार नाही,” विजय कुकडे सांगत होते.


त्यांच्या शब्दात-


“मी माझ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलो होतो. परत येत असताना नंदोरी चौकात एक मुलगा उभा होता, त्याच्या हाती पेटता टेंभा होता. हिवाळा असल्यामुळे शेकोटी पेटविण्यासाठी कचरा पेटवण्यासाठी ह्या व्यक्तीने टेंभा हातात घेतला असावा असा अंदाज मी व्यक्त केला. पण मागे गेल्यावर याच टेंभ्याने एका महिलेला पेटविण्यात आल्याच कळले,” कुकडे त्या दिवसाबद्दल सांगतात.


    आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्यानं अचानक घडलेल्या या घटनेनं पीडिता प्राध्यापिका किंचाळली, ती पेटत्या कपड्यांसह खाली बसली. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून एक दहावी अकरावीत जाणारा मुलगी धावत तिथे आली.


   काही लोक पाणी टाकून पीडितेला वाचविण्याचा प्रयत्न करत असतांना या मुलीने आपले स्वेटर काढून पिडितेच्या अंगावर टाकले आणि आग विझली.


परिसरातील युवक सुशील घोडे यानेही धावून मदत केली. विजय कुकडे यांनी पीडितेला एका कारने हॉस्पिटल मध्ये दाखल केले.


घटनाक्रम–

सकाळी 7 वाजून 5 मिनिटाने प्राध्यापिका एसटी बसमधून नंदोरी चौकात उतरली.

सकाळी 7 वाजून 7 मिनिटं – प्राध्यापिका महाविद्यालयाकडे हळूहळू पायी जाण्यास निघाली. त्याच वेळी एसटीच्या मागून दुचाकीने आलेला आरोपी विकेश नंदोरी चौकाजवळ थांबला.


सकाळी 7 वाजून 10 मिनिटं – गाडीतून पेट्रोल काढून. पेट्रोलने टेंभा भिजवला, नंतर तो प्राध्यापिकेच्या मागे पायीपायी गेला.

सकाळी 7 वाजून 15 मिनिटे – प्राध्यापिका चालत चालत न्यू महालक्ष्मी किराणा धान्य भांडारापर्यंत पोहचली. तेव्हा आरोपी विकेश नगराळे याने वेगाने चालत जात प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकले.


सकाळी 7 वाजून 17 मिनिटे – पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोलने भिजवलेला पेटता टेंभा फेकून तो दुचाकीकडे पळाला.

सकाळी 7 वाजून 20 मिनिटे- हल्ल्या करण्याआधीच त्याने दुचाकी सुरू ठेवलेली होती. त्यावरून तो पळाला.


हल्ल्यानंतर एकच गोंधळ उडाला त्यात आरोपी विकेशला पकडण्याचा प्रयत्न एका व्यक्तीनं केला पण तो हाती आला नाही.

सकाळी 7 वाजून 20 मिनिटे – पीडितेला कारने शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.


डॉक्टर प्रतिक्रिया-गेली 35 वर्षं मी आकस्मिक अपघात विभागात डॉक्टर म्हणून काम करतोय. पण हैवानालाही लाजवेल अशा पद्धतीनं एका प्राध्यापक महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेमुळे मी व्यथित झालोय. पीडितेच्या शरीरावर थेट पेट्रोल टाकून जाळल्यामुळे तिचा चेहरा, गळा, घसा, कानं, केस तसेच दातही जळून गेलेत. 


पीडितेची दृष्टी वाचली की नाही हे शु्द्धीवर आल्यावरच कळू शकेल. 35 वर्षांच्या मेडिकल करिअरमध्ये, एक डॉक्टर म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही माझ्या उभ्या आयुष्यात असा हल्ला मी पाहिला नव्हता. हा हल्ला सैतानालाही लाजवणारा होता,” अशी प्रतिक्रिया हिंगणघाट मधील पीडितेवर उपचार करणाऱ्या नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अनुप मरार यांनी दिली होती.


      ते पुढे म्हणाले, “पीडितेला वेळीच आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, तेव्हा आम्ही तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवलं, उपचार सुरू केले.”


 10 फेब्रुवारी 2020 रोजी या पीडितेने शेवटचा श्वास घेतला.


तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते.


या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या घटनेविरोधात अनेक मोर्चे निघाले. राजकीय नेत्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.


आज न्यायालय निकाल-

तरुणीला जाळून मारणाऱ्या विकेश नगराळेला वर्ध्याच्या कोर्टानं मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे, असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.


या आरोपीला 3 फ्रेबुवारी 2020 ला अटक करण्यात आली होती. पण गेल्या 2 वर्षांचा कालावधी त्याच्या शिक्षेत ग्राह्य धरला जाणार नाही, असंसुद्धा कोर्टानं स्पष्ट केलं आहे.


आज सुनावणी झाली त्याचा निकाल आज जाहीर झाला यावेळी माझ्या मुलीची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी होती, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली आहे.


 माझ्या मुलीला ज्या वेदना झाल्या, त्या वेदना आरोपीला जनतेसमोर झाल्या पाहिजेत, गेल्या 7 दिवसांत तिला खूप त्रास झाला. जसा माझ्या मुलीला त्रास झाला, तसा त्या आरोपीला झाला पाहिजे. निर्भयासारखं प्रकरण लांबायला नको, लवकर या प्रकरणाचा निकाल लागावा,” असं मत पीडितेच्या वडिलांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं होतं.


त्या वेळी घटनेची कविता

.. …षंढ….


एखाद्या हल्ल्यात

रस्त्यावर एखादी मुलगी

जळत असताना

तडफडत असताना

सगळीच भामटी

फोटो व्हिडिओ काढण्यात

मग्न असतात

मग ते मटेरियल सोशल मीडिया वर

अपलोड करण्यात

दंग का असतात


ऐनवेळी माई का लाल

षंढ होतात

पण पिडिता मेल्यावर मात्र

षंढाचे मर्द होतात

अन् हाताच्या बाह्या सावरत

सोशल मीडिया वर येतात


हाताची घडी तोंडावर बोट

प्रेक्षक मंडळी

मेणबत्त्या पेटवायची

नाटकं करतात

दुसरी केव्हा जळणार ?

याचीच तर वाट पहात असतात ?

राजू वाघमारे


झालेली दुःखद घटना फक्त ऐकून मन सुन्न होत .अशा दुर्देवी अंकितास अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments