सांगोल्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रारुप प्रभागरचना आराखडा फूटला?
राज्य निवडणुक आयोगाच्या मंजुरी अगोदरच प्रारुपरचना सोशल मीडियावर व्हायरल!
राजकीय नेत्यांचा प्रभाग रचनेत हस्तक्षेप, सोयीनूसार प्रारुप प्रभागरचना झाल्याची चर्चा
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणाचा कच्चा प्रारुप प्रभागरचना आराखडा राज्य निवडणुकीच्या तपासणी पुर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सांगोल्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारुप प्रभागरचनेत राजकीय पुढा-यांच्या हस्तक्षेप झाला
असून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी सोयीनूसार प्रारुप प्रभागरचना झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रारुप प्रभागरचना आराखडा, प्रशासकीय यंत्रणेतून फुटलाच कसा? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
राज्य निवडणुक आयोगाने 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंर्तगत 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयोगाने 2 फेब्रुवारी 2022 सर्व जिल्हाधिका-यांना सूचना दिल्या आहेत. त्यानूसार निवडणुकीचे कामकाज पाहणारे उपजिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार
यांनी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीसाठी सोलापूर जिल्ह्यातून उद्या शुक्रवार (दि.11 फेब्रुवारी) रोजी सकाळी 10.30 वाजता आयोगाच्या कार्यालयात उपजिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांना प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा, तपासणी करण्यासाठी हार्ड व साॅफ्ट काॅपीसह नकाशे इत्यादी कागदपत्रे आणण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सांगोला तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणाचा कच्चा प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणुक आयोगाकडे तपासणी पुर्वीच निवडणुक कामकाज करणा-या प्रशासकीय यंत्रणेकडून फुटल्याची चर्चा रंगली आहे.
तो प्रारुप प्रभागरचना आराखडा सोशल मिडियातून व्हायरल होवू लागला आहे. स्थानिक राजकीय पुढा-यांनी प्रारुप प्रभागरचनेत हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांच्या सोयीनूसार प्रभागरचना तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रारुप प्रभागरचना आराखडा अंतिम होण्यापुर्वीच प्रभागरचनेची कार्यकर्त्यांमधून चर्चा रंगली होती.
याबाबत प्रारुप प्रभागरचना आराखडा फुटल्याचा दावा तहसिलदार पाटील यांनी फेटाळला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रारुप प्रभाग रचना अधिकृतपणे अद्याप जाहीर झालेला नाही. लोकांचा गैरसमज करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाकडून जिल्हा परिषद प्रभाग रचना जाहीर केलेला आहे.
सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या चार प्रकारचा प्रारुप प्रभाग रचना माझ्याकडे सोशल मीडियातून आलेला आहे. त्या प्रारुप प्रभागरचना आराखडा प्रत्येक पक्षांनी आपआपल्या सोयींने बनविलेल्या आहेत. त्यावर निवडणुक अधिका-यांचा अधिकृत सही-शिक्का नाही. त्यामुळे त्या प्रारुप प्रभागरचना आराखडा लोकांनी ग्राह्य धरु नये.
अभिजित पाटील तहसीलदार, सांगोला

0 Comments