google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय जवानाची आत्महत्या, धक्कादायक घटना

Breaking News

पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय जवानाची आत्महत्या, धक्कादायक घटना

 पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय जवानाची आत्महत्या, धक्कादायक घटना


पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून या जवानाने आपल्या आयुष्याचा शेवट केला असल्याचं वृत्त आहे. पुण्यात या जवानाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरख नानाभाऊ शेलार असे या जवानाचे नाव आहे.


गोरख शेलार यांनी 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या केली आहे. गोरख हे सैन्य दलामध्ये भरती नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये कार्यरत होते. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.गोरख शेलार यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्या पत्नीसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी पत्नी अश्वीनी पाटील, युवराज पाटील, संगिता पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. नंदुरबार) यांच्यावर पुण्यातील वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा : अनिल देशमुख अडचणीत? सचिन वाझेंनी ‘ईडी’ला पत्र पाठवून केली ‘ही’ विनंती गोरख यांच्या भावाने केला गंभीर आरोप या प्रकरणी गोरख शेलार यांचे भाऊ केशव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.


आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं, 16 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या भावाचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून माझ्या भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील हिने 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार मानसिक त्रास दिला.


तुझी नोकरी घालवतो, गरोदर पत्नीचा गर्भपात करतो आणि तुझ्यासह तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करतो. नाहीतर सोडचिठ्ठी दे आणि 15 लाख रुपये दे असे वारंवार बोलून माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गोरख याने आत्महत्या केली.


आत्हत्येस प्रवृत्त केल्याने त्याच्या मृत्यूला माझ्या भावाची पत्नी अश्विनी, सासरा युवराज पाटील, सासू संगिता पाटील, मेव्हणा योगेश पाटील, मेव्हणी भाग्यश्री पाटील हे कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.

Post a Comment

0 Comments