google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ऊस गाळपासाठी सांगोला तालुक्यातील उत्पादक इतर कारखान्यांवर अवलंबून

Breaking News

ऊस गाळपासाठी सांगोला तालुक्यातील उत्पादक इतर कारखान्यांवर अवलंबून

 ऊस गाळपासाठी सांगोला तालुक्यातील उत्पादक इतर कारखान्यांवर अवलंबून

सांगोला : गेली 12 वर्षे बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना पंढरपूरचे अभिजीत पाटील यांनी 'धाराशिव' (युनिक क्र. - 4) नावाने अवघ्या 35 दिवसांत गाळप सुरू केले. सांगोला कारखाना नव्याने सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आशादायक वातावरण निर्माण असले तरी गाळपासाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना इतर तालुक्याच्या कारखान्यावर अवलंबून राहावे लागत आहे.


 धाराशिव कारखान्याने आतापर्यंत 2 लाख 50 मेट्रिक टन (सांगोला - पंढरपूरसह) गाळप झाले आहे. तालुक्यात यावर्षी एकुण 4 हजार हेक्टरवर जुन्या - नव्या ऊसाच्या क्षेत्राची नोंद झाली आहे. अध्यापही तालुक्यातील अंदाजे एक लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. तालुक्यात दिवसेंदिवस डाळिंब क्षेत्र घटू लागल्याने व शेतीच्या पाणीपुरवठा सध्या सुरळीत झाल्याने यापुढे तालुक्‍यात अजुनही ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.


सांगोला तालुका म्हटले की 'डाळिंबाचे कोठारा' अशीच ओळख होती. परंतु या डाळिंब कोठारालाच कीड लागल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळू लागला आहे. सध्या तालुक्यात पाऊसमान चांगला झाला व नीरा उजवा कालवा, टेंभू-म्हैसाळ व इतर योजनांतील पाण्यामुळे शेतकरी ऊसाची लागवडही मोठ्या प्रमाणात करु लागला आहे. गेली 12 वर्ष बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना पंढरपूरचे अभिजीत पाटील यांनी अवघ्या 35 दिवसांत गाळप सुरू केले असून 2 लाख 50 मेट्रीक टन गाळप झाले 


असून 10.60 रिक्वरी आहे. कारखान्याने 15 जानेवारी पर्यंत ऊस बिले व 31 जानेवारी पर्यंत वाहतूक ठेकेदारांचीही बिले जमा केली आहेत. ऊस तोडणी व ऊसबिले व 31 जानेवारी पर्यंत वाहतूक ठेकेदारांचीही बिले जमा केली आहेत. यापुढेही हा कारखाना नियोजनबद्ध पद्धतीने सुरु राहिल. अजून 1 लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट असून या भागातील ऊस संपेपर्यंत कारखाना सुरूच राहील - अभिजीत पाटील, अध्यक्ष, धाराशिव साखर कारखाना.


सध्या सांगोला तालुक्यामधून 26 हजार 463 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून या तालुक्यामधून नोंद झालेले 15 हजार मेट्रिक टन अद्याप ऊस बाकी आहे. हा राहिलेल्या ऊसाची तोडणी लवकरच करण्यात येईल. आमच्या कारखान्याकडे नोंद केलेला कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस तोडणी करण्याचा राहणार नाही.


- पी. जी. शिंदे, मुख्य शेती अधिकारी, सिताराम महाराज साखर कारखाना, खर्डी, ता. पंढरपूर. आमच्या भैरवनाथ कारखाने सांगोला तालुक्यामधून 17 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. अद्यापही 5 ते 6 हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी येणार आहे व त्याचे काम सुरूच आहे.


- कृष्णदेव लोंढे, शेतकी अधिकारी, भैरवनाथ शुगर, लवंगी, ता. मंगळवेढा.

सांगोला तालुक्यामधून आमच्या कारखान्यास आत्तापर्यंत 43 हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आला असून अद्यापही नोंद असलेला 13 हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. 20 मार्चपर्यंत हा सर्व ऊस तोडणी करून गाळपासाठी नेण्यात येईल

Post a Comment

0 Comments