बायको नसल्याचे कारण सांगून एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकारी असलेल्या नराधमाची झाली धुलाई
नवी मुंबईतील नेरुळ येथील संस्थेत कामाला लावण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले आहे. पकडल्यावर त्याची चांगलीच धुलाई केली आणि मग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या बाबतीत अधिक माहिती असी की, या घटनेतील नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. नेरुळ येथील एका मोठ्या संस्थेत नोकरीसाठी एका गरजू महिलेने अर्ज केला होता.या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने या असाह्य महिलेकडे शरीरसुख देण्याची मागणी केली होती. प्रेम चव्हाण असं या नराधमाचे नाव आहे. हा प्रेम चव्हाण बीआरसीमध्ये हाऊस किपिंगचे काम करतो. या नराधमाविरोधात एका महिलेने या विरोधात मनसेच्या बाळसाहेब शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली.
या नराधमाने पीडित महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकून माझी पत्नी नसल्याने नोकरीच्या बदल्यात शरीरसुख देण्याची मागणी लाऊन धरली होती, तसेच या पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून वाशी येथील लॉजमध्ये बोलवले. यावेळी हा नराधम लॉजमध्ये आला असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला रंगेहाथ पकडले.
मनसेचे कार्यकर्ते त्याच्यावर तुटून पडले. त्याला लॉजमधून बाहेर आणले आणि चांगलाच चोप दिला. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. असाहाय्य महिलेचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेल्या आशा प्रकारच्या नराधमांना यामुळे धडा मिळाला आहे.
0 Comments