google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Breaking! राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात; पहाटेपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू

Breaking News

Breaking! राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात; पहाटेपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू

 Breaking! राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात; पहाटेपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू

राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. आज सकाळी 7.30 वाजेदरम्यान मलिक ईडी कार्यालयात हजर झाल्याची माहिती मिळत आहे. ईडीने समन्स बजावल्यामुळे मलिक चौकशीसाठी हजर झाले आहेत. त्यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची शक्यता आहे.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, जमीन खरेदी प्रकरणात ईडीने मलिक यांना समन्स बजावले असून, त्या चौकशीसाठी त्यांना आज बोलण्यात आले आहे. आज सकाळी 6.30 वाजता ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी आले होते. त्यानंतर मलिक 7.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, दाऊद इब्राहीम मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकांची चौकशी करण्यात असून, दाऊदचा भाऊ इकबाल कासकरच्या चौकशीनंतर मलिक ईडीच्या रडार आहेत.


गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे चर्चेत आलेल्या ईडीने आज महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे ईडी कार्यालयात दाखल झाले असून, अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला जात आहे.


ईडी कार्यालयात जबाब नोंदवला जात असताना पोलिसांनी बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. नवाब मलिक यांनी सरदार खान या व्यक्तीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या ३० लाखांत खरेदी केली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही याआधी मलिकांवर हा आरोप केला होता. सरदार खान हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक असून त्याचा १९९३ च्या मुंबई सिरीअल बॉम्ब ब्लास्टमध्येही सहभाग होता.


ईडीच्या कार्यालयाबाहेर मुंबई पोलिसांनी बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे

सरदार खान सध्या औरंगाबाद जेलमध्ये कैदेत असून दाऊदची बहीण हसीना पारकरच्या एका व्यक्तीने नवाब मलिक यांना या जागेच्या व्यवहारात मदत केल्याचं कळतंय. मलिकांच्या याच व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments