google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “तृतीय पंथीय मुलीशी विवाह”, तरुणाचा कौतुकास्पद निर्णय!

Breaking News

“तृतीय पंथीय मुलीशी विवाह”, तरुणाचा कौतुकास्पद निर्णय!

 “तृतीय पंथीय मुलीशी विवाह”, तरुणाचा कौतुकास्पद निर्णय!

बीडः समाजात नेहमीच नकारात्मक वागणूक मिळणाऱ्या तृतीय पंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असा विचार करत बीडमधील एक तरुण पुढे आला आहे. शहरातील किन्नर सपना आणि बाळू नावाचा तरुण विवाहबद्ध होणार आहेत. मागील अडीच वर्षांपासून या दोघांची मैत्री असून आता या दोघांनी पुढील आयुष्यातही एकमेकांची साथ द्यायची असा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात हे दोघेही विधिनुसार लग्न करणार असल्याची माहिती या दोघांनी दिली आहे.


बाळू धुताडमल हा जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. अशातच त्याची ओळख सपनाशी झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अडीच वर्षानंतर त्यांनी आपला संसार करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजात आजही या घटकाला स्वीकारण्यासाठी लोक तयार नसतात. त्यामुळे लग्न करण्याचा विचार या जोडप्या समोर निर्माण झाला आहे. त्यांनी पत्रकार संघाच्या आयशा शेख यांची भेट घेतली. आणि चर्चेतून मार्ग काढून अखेर विवाह जुळवण्याचा निर्णय बीडच्या पत्रकार संघाने घेतला आहे.


याआधी मनमाड मध्ये किन्नर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे हे विवाह बंधनात अडकले होते. या विवाहानंतर मराठवाड्यातील हा पहिला विवाह होणार आहे. येत्या मार्च महिन्यात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. या दिवशी बाळू आणि सपना हे दोघेही लग्न करणार आहेत.

Post a Comment

0 Comments