google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लसीच्या साईड इफेक्टमुळे झालेत १६७ जणांचे मृत्यू !

Breaking News

लसीच्या साईड इफेक्टमुळे झालेत १६७ जणांचे मृत्यू !

 लसीच्या साईड इफेक्टमुळे झालेत १६७ जणांचे मृत्यू !

नवी दिल्ली : लसीकरण हे कोरोना संकटात वरदान ठरले आहे परंतु लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील साईड इफेक्टमुळे तब्बल १६७ जणांचे मृत्यू झाल्याची माहिती केंद्र शासनाने अधिकृतपणे दिली आहे. 


कोरोना प्रतिबंधात्मक लस कोरोनाच्या संकटकाळी अत्यंत वरदान म्हणून समोर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी चिंता व्यक्त केली जात होती पण पहिल्या आणि विशेषतः दुसऱ्या लाटेसारखा विध्वंस तिसरी लाट करू शकली नाही. शासनाने लसीकरण मोहीम गतिमान केली असताना लसीबाबत अनेक प्रकारचे गैरसमज आणि भीती अजूनही असून त्यामुळे अनेकांनी अद्याप ही लस घेतलेली नाही. 


लसीचा वाद न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे आणि लस ही सक्तीची नसल्याचे शासनास न्यायालयात सांगावे लागले आहे. शिवाय लस घेताना लहान मुलांचे मृत्यू झाल्याचेही प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले त्यामुळे ही भीती आणखी वाढण्यास मदत झाली.  आता मात्र दोन्ही डोस घेतल्यानंतर साईड इफेक्टमुळे मृत्यू झाल्याची माहिती अधिकृतपणे समोर आली आहे.


कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साईड इफेक्टमुळे झालेल्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर विपरीत परिणामांच्या घटनात १६७ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लोकसभेत दिली आहे. याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. सदर मृत्यू देशातील वेगवेगळ्या राज्यात झालेले आहेत. 


केरळ राज्यात अशी सर्वाधिक प्रकारणे समोर आली आहेत. एकट्या केरळमध्ये ४३ जणांचा अशा प्रकरणात मृत्यू ओढवला आहे तर महाराष्ट्रात १५ जणांना अशा प्रकारे प्राण गमवावे लागले आहेत. पश्चिम बंगालमध्ये १४, मध्य प्रदेशात १२, ओरिसामध्ये १२ जणांचे मृत्यू झाले


 असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली आहे. ३ फेब्रुवारी पर्यंत स्तनपान देणाऱ्या महिलात लसीकरणानंतर प्रतिकूल परिणाम झाल्याच्या १३ प्रकरणांची नोंद झाली असून यात लक्षणे मात्र सौम्य होती अशी माहिती देण्यात आली आहे.


संपूर्ण देशामधील ही आकडेवारी असून नागरिकांनी लस घेणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. लस घेतल्याने कोरोनाला अटकाव करता येतोच पण अन्य आजार देखील बरे झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे. लस घेतल्यानंतर लकवा बरा झाल्याचा एक दावा समोर आला होता. गेली कित्येक वर्षे जमिनीला खिळून असलेल्या व्यक्तीच्या शरीराची हालचाल सुरु झाली आणि न हलणारे त्याचे अवयव काम करू लागले 


असल्याचा एक दावा अलीकडेच समोर आला होता. एकाने तर सलग अकरा वेळा ही लस घेतली आणि बाराव्या वेळी मात्र तो पकडला गेल्याची घटना देखील पुढे आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे आपले अन्य आणि जुने आजार आपोआप बरे झाले असल्याचा दावा देखील अनेकांनी केलेला आहे.

Post a Comment

0 Comments