google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : व्हायरल प्रभागरचनेवर प्रशासनाने झटकले हात

Breaking News

सोलापूर : व्हायरल प्रभागरचनेवर प्रशासनाने झटकले हात

 सोलापूर : व्हायरल प्रभागरचनेवर प्रशासनाने झटकले हात

सोलापूर : कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षण यामुळे लांबणीवर पडलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना करण्यात आली आहे.सांगोला व पंढरपूर या तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारूप प्रभागरचना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या प्रभागरचनेचा आणि आमचा काहीच संबंध नसल्याचे सांगत प्रशासनाने हात झटकले आहेत.


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी सदस्य संख्या वाढ झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या आता ६८ वरून ७७ झाली आहे. जिल्ह्यातील ११ तालुका पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या आता १३६ वरून १५४ एवढी झाली आहे. वाढलेली सदस्य संख्या आणि जिल्ह्यात अनगर (ता. मोहोळ), वैराग (ता. बार्शी), श्रीपूर-महाळुंग व नातेपुते (ता. माळशिरस) येथे नव्याने अस्तित्वात आलेली


 नगरपंचायत, अकलूज येथे नव्याने अस्तित्वात आलेली नगरपरिषद यामुळे आगामी निवडणुकांसाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रभाग रचना कशी असणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्या गावाचा समावेश कोणत्या गटात गणात झाला असेल? याची कमालीची उत्सुकता इच्छुकांमध्ये लागली आहे.


सोशल मीडियावर झळकत असलेल्या या प्रारूप प्रभागरचनेवर ना कोणाची सही आहे, ना कुठला शिक्का, त्यामुळे या प्रभागरचनेबद्दल संशय व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने तयार केलेली कच्ची प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (ता.११) राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली


 आहे. राज्यातील २५ जिल्हा परिषदांसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली असून ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान, राज्य निवडणूक आयोग ही प्रारूप प्रभागरचना तपासणार आहे. त्यानंतर प्रारुप प्रभागरचना जाहीर करून त्यावर हरकती मागविण्याचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रारूप प्रभागरचनेचा आणि प्रशासनाचा काहीच संबंध नाही. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्याबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. आयोगाच्या सूचनांनूसार प्रारूप प्रभाग रचना जाहीर होईल व त्यावर कोणाचे आक्षेप असतील तर स्वीकारले जातील.


- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

Post a Comment

0 Comments