सोलापूर : पुष्पा बोले तो फ्लॉवर समजे क्या,फायर हूं मै"...काय आहे प्रकार
सोलापूर : मागील चार महिन्यापासून थकीत असलेल्या सर्व कामांचा मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी लालबावटा आशा वर्कर्स गटप्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता
मात्र पोलिसांनी या आंदोलन करण्यास आशा सेविकांना मज्जाव केला. शेवटी संघटनेच्या जिल्हा सचिव पुष्पा पाटील व जिल्हा कोषाध्यक्ष सिद्धाराम उमराणी यांच्या नेतृत्वाखाली पाच महिलांच्या शिष्टमंडळासह निवेदन मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले.
यावेळी संघटनेची भूमिका मांडताना पुष्पा पाटील यांनी पंधरा दिवस प्रशासनाकडून वाट पाहू अन्यथा येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पाटील यांनी दिला
या आहेत संघटनेच्या मागण्या👇👇👇👇
जुलै 2020 पासून राज्य शासनाने आशा कार्यकर्तीना 2000 रुव आशा गटप्रवर्तकांना 3000 रु मानधन वाढ करण्याचा शासकीय आदेश काढला होता, परंतु अद्याप या आदेशाची अंमलबजावणी पूर्णतः झालेली नाही.
मागील चार महिन्यापासून ही वाढीव रक्कम मिळालेली नाही ती त्वरित मिळावी.
2) जुलै 2021 पासून राज्य शासनाने आशा कार्यकर्तीना 1000 रु व आशा गटप्रवर्तकांना 1200 ची मानधन बाद तमेन कोव्हीड प्रोत्साहन भना 500 रु देण्याचा शासकीय आदेश काढलेला आहे. परंतु मागील 7 वाढ महिन्यांपासून ही वाढ मिळालेली नाही. ती त्वरित मिळावी.
3) केंद्र सरकारने ऑक्टोबर 2021 पासून कोव्हीड प्रोत्साहन भत्ता आशा सेविकांना दरमहा 1000 य गटप्रवर्तकांना 500 रु पूर्ववत सुरू केलेला आहे, परंतु मागील 4 महिन्यांपासून हा मोबदला मिळालेला नाही तो त्वरित मिळावा.
4) आशा सेविकांना गरोदर मातांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात घेऊन जावे लागते, प्रसंगी त्यांना रात्री पेशंट सोवत मुक्काम करावा लागतो, परंतु शासकीय रुग्णालयात त्यांच्यासाठी निवासाची सोय नसल्याने आशा मेविकांना रुग्णालयात उघड्यावर झोपावे लागते, आशा कक्षाबाबत शासनाने आदेश काढून देखील शासकीय रुग्णालयात अद्यापही आशा कक्षाची सोय करण्यात आलेली नाही तरी ताबडतोबीने आशा कक्ष उभारण्यात यावेत.
5) आशा व आशा गटप्रवर्तकांना कामावर आधारित मोबदला मिळतो. कोव्हीड महामारी सुरू झाल्यापासून कोव्हीड सर्वेक्षण व लसीकरण मोहिमेत सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत काम करावे लागत असल्याने त्यांना नियमित कामे करण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्यांची नियमित कामे मागे पडल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडून विनामोबदला लसीकरणाचे काम करून घेणे शासनाने त्वरित थांबवावे,
6) आशा व आशा गटप्रवर्तकांना कोव्हीड लसीकरण मोहिमेचा मोबदला त्वरित मिळावा.

0 Comments