सांगोल्याच्या पोलिस निरीक्षकपदी अनंत कुलकर्णी
ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी जिल्ह्यातील बऱ्याचश्या पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकिय कारणास्तव ह्या बदल्या केलेल्या आहेत
सांगोला/ नाना हालंगडे सांगोला पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सुहास लक्ष्मण जगताप यांची गुन्हे शाखा सोलापूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी अक्कलकोट उत्तरचे पोलिस निरीक्षक अनंत महिपतराव कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी गुरुवार, 17 फेब्रुवारी रोजी काढले आहेत.
पोलिस निरीक्षक सुहास जगताप हे दीड वर्षापूर्वी सांगोला पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या काळात अनेक जबरी गुन्हाची उकल करून आरोपींना जेरबंद केले होते. तसेच सांगोला तालुक्यात कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी त्यांनी चांगले पोलिसिंग केले.
अशातच जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाने त्यांची गुरुवारी 17 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आलेली आहे.
तर सांगोला पोलिस ठाण्याला नव्यानेच अक्कलकोट उत्तरचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना ऑर्डर झालेली आहे. पण सध्या शिवजयंती उत्सव असल्याने सोमवारी नवीन पोलिस निरीक्षक कुलकर्णी हे हजर होणार आहेत. अशी माहिती सूत्रांकडून कळते.
ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी जिल्ह्यातील बऱ्याचश्या पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकिय कारणास्तव ह्या बदल्या केलेल्या आहेत

0 Comments