सुभाष देशमुखांच्या विचारधारेची 'किव'येते ; काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंहाचे बापूना उत्तर
सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या एका बैठकीत दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस मुक्त करण्याची भाषा केली. त्यावर दक्षिण मतदारसंघावर डोळा असलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता,
काँग्रेस पक्ष कधीच संपू शकत नाही, ज्यांनी संपवायची भाषा केली ते संपले आहेत, देशात लोकशाही काँग्रेसने टिकवली जिथे सत्ताधारी आहे तिथे विरोधक असणे हीच लोकशाही, कुणी काँग्रेस संपवण्याची भाषा करणे म्हणजे त्यांच्या विचारसरणीची मला कीव येते असे या शब्दात धवलसिंहानी आमदार सुभाष देशमुख यांचे नाव न घेता उत्तर दिले.

0 Comments