google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस ठाणे येथे दाखल खुनाच्या गुन्हयाचा २४ तासात छडा लावुन ५ आरोपीत यांना अटक

Breaking News

सांगोला पोलीस ठाणे येथे दाखल खुनाच्या गुन्हयाचा २४ तासात छडा लावुन ५ आरोपीत यांना अटक

 सांगोला पोलीस ठाणे येथे दाखल खुनाच्या गुन्हयाचा २४ तासात छडा लावुन ५ आरोपीत यांना अटक



 यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की दिनांक ०६/०२/२०२२ रोजी रात्री ११:०० वा . चे . सुमारास नेज , ता . हातकणंगले , जि . कोल्हापूर येथून माझा मुलगा संजय भगवान चव्हाण , वय ३० वर्षे , रा . महमदाबाद हुन्नूर , ता . मंगळवेढा यास कोणत्या तरी कारणावरून जिवेठार मारण्याच्या उद्देशाने पाच ते सहा अनोळखी इसमांनी 


मारहाण करून त्याची मोटारसायकल नं . एम एच १३ डी एल ६६०४ हिच्यासह त्यांच्या अनोळखी मोटारसायकलवरून अपहरण करुन कशाने तरी संजय याच्या डोक्यात मारहाण करून त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने त्याचे प्रेत मोटारसायकल सह उदनवाडी ते चोपडी जाणारे रोड लगतच्या भारत आबा वलेकर यांच्या शेताजवळील रोडच्या कडेला असलेल्या दगडामध्ये 


उदनवाडी , ता . सांगोला येथे आणून टाकून दिले आहे . म्हणून माझी अनोळखी पाच ते सहा इसमांविरुद्ध तक्रार आहे . अशा वगैरे मजकुरची तक्रार दिल्याने सांगोला पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १३५ / २०२२ भादविसक ३०२ , ३६४ , २०१ , १४ , १४७ , १४८ , १४ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने गुन्हयातील आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे कामी 


मा श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण , श्री हिम्मत जाधव अपर पोलीस अधिक्षक सो सोलापूर ग्रामीण , श्रीमती राजश्री पाटील मा उप विभागीय पोलीस अधिकारी सो मंगळवेढा विभाग यांनी श्री सुहास जगताप पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे यांना आदेश देण्यात आलेले होते सदरचे घटनास्थळी श्री राजश्री पाटील मा उप विभागीय पोलीस अधिकारी सो मंगळवेढा विभाग ,


 श्री सुहास जगताप पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे , यांनी हेमंतकुमार काटकर सहा पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे , डी बी पथकातील कर्मचारी यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे करण्यासाठी यातील मयताचे कोणासोबत वैर होते काय याबाबत माहिती घेवून त्या अनुषंगाने चौकशी केली 


असता यातील मयताचे गावातील काही व्यक्ती सोबत काही वाद असल्याचे गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती सद दर माहितीवरून पुढील तपास सुरु केला असता दि ०७/०२/२०२२ रोजी यातील २ आरोपीत यांना चौकशीकामी हुन्नुन गावातुन ताब्यात घेवून चौकशी केली असता यातील मयत यांने आरोपीत १ व २ यांचे बहिणीला एका वर्षापूर्वी प्रेमसंबधातुन पळवुन नेलेले होते 


त्यावरुन यातील मयत संजय चव्हाण हा आरोपीत १ व २ यांना वांरवार फोन करून तुमच्या बहिणीला पळवून नेले तुम्ही माझे काय केले अशी खुन्नस देत होता याचा मनात राग धरून मयत हा नेज ता चिक्कोडी जि बेळगाव येथे आला असल्याचे माहिती मिळाल्याने यातील आरोपी क्रमांक ५ ( आरोपीचा मेव्हणा ) याला सोबत घेवुन यातील आरोपीत ३ व ४ यांना सांगली येथे फोन करुन बोलावून घेवून यातील मयत संजय चव्हाण हा राहत असलेल्या नेज ता चिक्कोडी 


जि बेळगाव येथे जावुन त्याचे अपहरण करून त्याला उदनवाडी ते चोपडी रोडवर आणुन त्याच्या डोक्यात दगड घालुन खुन करून अपघाताचा बनाव करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी कोणतही प्रथमदर्शनीय पुरावा नसताना कौशल्यपुर्ण तपास करून यातील ५ आरोपीना २४ तासाच्या आत अटक करण्यात आलेली आहे 


यातील आरोपीत ४ आरोपीत यांना १५/०२/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे सदर गुन्हयाचा तपास मा श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण , श्री हिम्मत जाधव अपर पोलीस अधिक्षक सो सोलापूर ग्रामीण , श्रीमती राजश्री पाटील मा उप विभागीय पोलीस अधिकारी साो मंगळवेढा विभाग श्री सुहास जगताप पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंतकुमार काटकर हे करीत आहेत


 सहा फौजदार बाबासाहेब भांतुगडे , पोहेकॉ १२४२ रमेश बनसोडे , पो हे कॉ दत्ता वजाळे , पोना अभिजित मोहळकर , पोना राहुल कोरे , पो ना आप्पासो पवार , पोना सचिन वाघ , पो कॉ सिध्दनाथ शिंदे पो कॉ शशिकांत सांवत , पो ना धनजयं इरकर , पो कॉ अमर पाटील सांगोला पोलीस ठाणे तसेच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पो ना दयानंद हेबांडे , सायबर पोलीस ठाण्याचे अन्चर अत्तार यांनी सदर तपासकामी मोलाची कामगिरी बजावलेली आहे 


( सुहास जगताप ) पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे

Post a Comment

0 Comments